मंगल आरती
मंगलमय महालिंगोद्भव गुरु , शिवांग पंचाचार्यांना ॥
लिंगविभूषित , भंगभयादी , मंगल आरती , करु त्यांना ॥धृ॥
जन्ममरण भय , हरण करुनि , पावन करिशी भक्तांना ॥
तन मन अर्पण , करितो भावे , सिध्द रेणुकाचार्यांना ॥1॥
थोर घोर भव , दुर कराया , सुरवर भाकिती तव करुणा ॥
वीरशैव मत , वारिधिशशिधर , सार दारुकाचार्यांना ॥2॥
लोकदयाळा सर्वव्यापका , अससी बोधक सकलांना ॥
शोकनाशका , भाकितो करुणा , एकोरामाराध्यांना ॥3॥
चंडमतासी खंडन करुनि , बोधिशी ब्रम्हा खंडांना ॥
पिंडीब्रम्हांडी , गुरु व्यापका , नमितो पंडिताराध्यांना ॥4॥
विश्वेश्वर , लिंगोद्भव होशी , विश्वपालना दयाघना ॥
ईश्वरभक्तीसी , शाश्वत करी त्या , स्मरितो विश्वाराध्यांना ॥5॥
अज्ञ बांधवा , सुबोध कराया , नमितो पंचाचार्यांना ॥
वीरगोत्रोद्भव , सांब विनवितो , कृपा करावी या दीना ॥6॥
No comments:
Post a Comment