Saturday, 8 February 2014

यावे यावे हो गणराय

यावे यावे हो गणराय मला माहेराला न्याया , आला गौरीचा सण मोहरलं मन माहेराला जाया , यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया ।।1।। मी सासुरवासिन घरची कोंड्या मांड्याचा संसार करती , गेली जिंदगी असीच पुरती तुझा आधार मंगलमूर्ती , नको संपत्ती धन दे समाधान ठेव तुझी छाया , यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया ।।2।। जरी प्रेमळ माझं सासर मुलाबाळांनी भरलं घर , माझं माहेर राहिलं दुर उठे मनामध्ये काहूर , आता दुरावली नाती हरवली गोती दे रे तुझी माया , यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया ।।3।। साद कावळा घालितो दारी गळां उंबाळा दाटतो भारी , माय बापाची आठव सारी मन पाखरु घेतयं भरारी , हे इथं माहेर डोळ्यासमोर झुरते ही काया , यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया ।।4।।

No comments:

Post a Comment