Saturday, 8 February 2014

मन्मथा तुझं नाव

ध्यास तुझा मनामध्ये , डोळ्यामध्ये भाव । मन्मथा तुझं नाव रे , देवा तुझं नाव ॥1॥ भव्य तुझा तोगाभारा , झुळझुळ वाहे थंड वारा । पाहताची भव्य धारा , हलका होई जीव सारा । दर्शनाची ओढ लागे , मन घेई धाव । मन्मथा तुझं नाव रे , देवा तुझं नाव ॥2॥ कार्तिक पौर्णिमेला , दिव्य असा सोहळा । शिवनाम गात गात , कुंकवाचा पाजला । साक्ष तुझ्या रुपाची , शिवराजा मला दाव । मन्मथा तुझं नाव रे , देवा तुझं नाव ॥3॥ कपिलाधार दिंडीमध्ये , शरण जाम थाटतो । नाम घोष अंतरी , आनंद कंठी दाटतो । कपिलाधार सान साजे , मन्मथ माऊलीचं गाव । मन्मथा तुझं नाव रे , देवा तुझं नाव ॥

No comments:

Post a Comment