श्री
लक्ष्मण महाराज या वीरशैव संतकवींचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील
धोतर जोड्याची आष्टी (ता. परतूर) येथे झाला. त्यांची अभंग, पदे, कथानक
पदे, भूपाळ्या, वासुदेव, अष्टके, आरत्या, आर्य इत्यादी मिळून ४२५६ एवढी
रचना उपलब्ध झाली आहे. त्यांची ओवी रचना
१२५३ एवढी आहे. अभंग व ओव्या मिळून एकूण ५५०९ एवढ्या विपुल संख्येने
महाराजांची रचना उपलब्ध झाली असून तीचे प्रकाशन "लक्ष्मण गाथा" या
पुस्तकाच्या रूपाने झाले आहे. लक्ष्मण महाराजांची सवर्च बाडे उपलब्ध झाली
असा दावा करता येत नाही. या शिवाय त्यांची रचना अधिक असण्याचा संभाव आहे.
एवढी विपुल आणि वैविध्यपूर्ण रचना असलेले लक्ष्मण महाराज हे एकमेव वीरशैव
संतकवी होत.
No comments:
Post a Comment