Saturday, 8 February 2014

कपिलाधारचा महिमा अपरंपार

कपिलाधारचा महिमा अपरंपार


"अतिथी देवो भव "

याचा अनुभव कपिलधार मध्ये फार
चांगला येतो. बाहेरील गावातून, जिल्हयातून,राज्
या मधून,आलेल्या भक्तांना शक्य
ती आणि जमेल ती सगळी मदत राहण्याची ,
जेवणाची ,व्यवस्था कपिलधार येथे
श्री मन्मथ स्वामी कृपेने तेथील भाविक
आनंदाने करत असतात;आणि केली जाते.
याच कपिलधार गावातील
यात्रा बघण्यासारखी असते. एकदा एखाद्याने
इथली यात्रा अनुभवली की त्याला वारंवार यात्रेसाठी या गावात यावंसं वाटलं तर
काहीच नवल नाही. याच गावातलं जगप्रसिद्ध " श्री संत
शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज
यांची समाधी ". या मंदिराला एकदा भेट देऊन मन भरत
नाही, स्वानुभवावरून सांगतोय. रात्री या मंदिराची केलेली नेत्रदीपक
रोषणाई तर न चुकवण्यासारखी.
मंदिराच्या परीसरात जलधारा आहेत , त्या जलधाराच्या स्वच्छ पाण्यात
भाविक अंघोळ करत असतात . ती अंघोळ
मनाला व तनाला पवित्र करून सोडते . या यात्रेच्या महिन्यात
गुलाबी थंडी असल्यामुळे नैसर्गिक
सौंदर्य बघण्यासारखे लाजवाब असते . या नैसर्गिक सौंदर्या बरोबरच
पौर्णिमेचा तो चंद्र ,व खुले
चांदण्याचा लखलखता प्रकाश,लखलखणारे
चांदणे,भक्तांचा सागर व
भक्तीचा जयजयकार त्यामुळे हा घेतलेला अनुभव खूप भावनिक
असतो . हा अनुभव मनाला प्रसन्न
आणि समाधानी करतो . विशेषता : येथे विविध भागामधून संत येत
असतात . त्यांनी या भक्तिमय वातावरणात
दिलेला संदेश ,मार्गदशन ,कीर्तन ,प्रवचन ,भजन
आणि मन्मथ स्वामीच्या जयघोषात
निर्माण केलेल्या वातावरणामुळे रात्री या मंदिराचं
प्रतिबिंब फार सुरेख दिसतं. यात्रे मध्ये या मंदिराला फार सुरेख
रोषणाई केली जाते. त्यामुळे आधीच अप्रतिम
असलेल्या या मंदिराच्या सौंदर्यात
चांगलीच भर पडते. चारही बाजूंनी लखलखणारं मंदीर
आणि त्यात तेवढंच सुंदर त्या रोषणाईचं जलधार्यात दिसणारं
प्रतिबिंब................क्या बात है !!!! 
शेवटी सर्वाना आवर्जून सांगावेसे
वाटते , कपिलाधार हे वीरशैवांचं तीर्थक्षेत्र
आहे. प्रत्येक वीरशैवाने
मन्मथमाऊलींनी केलेल्या या थोरधर्मकार्याचं
आणि संजीवन समाधीचं दर्शन घ्यावं. प्रत्येकाच्या मनात
शिवभक्ति प्रवाहित झाली पाहिजे. 
बोला सर्वानी "श्री संत
शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की "
……… जय !!!!!!!!!!!

post credit :- नितिन शंकर जंगम
https://www.facebook.com/nitinshankar.jangam

No comments:

Post a Comment