Thursday, 6 February 2014

रुद्राक्षधारणस्थल

रुद्राक्षधारणस्थल
रुद्र-अक्षातून उत्पन्न जहाले।
'रुद्राक्ष' मिळाले नाव जाणा १
त्रिपूर-संहारा दृष्टी अनिमेष।
लावी आशुतोष भक्तसखा २
तेव्हा नेत्रांतून योगाश्रू वर्षले।
नाव ते पावले 'रुद्राक्ष' हे ३
शिवभक्ते कंठामध्ये रुद्रमाळ।
सदासर्वकाळ बाळगावी ४
भस्म नि रुद्राक्ष हेच अलंकार।
त्यांना नाही चोर जगामध्ये ५
सुवर्णासारखे नाही प्रदर्शन।
भरे पूर्ण मन सत्त्वगुणे ६
शेष म्हणे वीरशैवांची भूषणे।
देही आवडीने वागवावी ७

-शे. दे. पसारकर, सोलापूर

No comments:

Post a Comment