भस्मधारणस्थल
अष्टावरणात 'भस्म' आवरण।
करिते रक्षण साधकाचे ।।१।।
'महाभस्म' ऋषी शिवाला म्हणती।
ह्रदयात ध्याती सदोदित ।।२।।
विभूती, भसित, भस्म, रक्षा, क्षार।
पाच हे प्रकार विभूतीचे ।।३।।
ऐश्वर्या कारण म्हणून 'विभूती'।
भस्माला म्हणती मुनिश्रेष्ठ ।।४।।
नित्य करी शिवतत्त्व प्रकाशित
म्हणून 'भसित' नाव त्याचे ।।५।।
सर्व पातकांचे करिते भर्त्सन।
'भस्म' हे म्हणून नाव साजे ।।६।।
त्रितापांचा क्षय करिते सत्वर।
म्हणूनच ' क्षार' संबोधिती ।।७।।
भूत-प्रेत-ग्रहांपासून रक्षिते।
म्हणून 'रक्षा' ते शेष म्हणे ।।८।।
-शे. दे. पसारकर, सोलापूर
No comments:
Post a Comment