Tuesday, 29 April 2014

आरती मन्मथस्वामींची -शे. दे. पसारकर ('श्रीमन्मथचरितामृत' ओवीबद्ध चरित्रग्रंथ)

     आरती मन्मथस्वामींची

आरती मन्मथस्वामींची।
संतशिरोमणी प्रमथांची।।ध्रु.।।
त्यागूनि इष्टलिंग शिवा। मूढ आराधी अन्य देवा।
जन्मूनि शिवाचार कुळी। रेखिती उभे गंध भाळी।
असे जे भुलले वीरशैव, तयांना नीट, धीरपणे वाट,
दाविली धर्माचरणाची...आरती मन्मथस्वामींची।।१।।
कीर्तन-भजनाच्या छंदे। डोलती भक्त निजानंदे।
निवडूनि परमरहस्यार्थ। दिधले भक्ता नवनीत।
अंबर उठले गर्जून, शिव शिव घोषे, अति उल्हासे,
फुलली मने भाविकांची... आरती मन्मथस्वामींची।।२।।
मन्मथ आला भूवरती। आता नाही तुम्हा भीती।
ऐसे बोधूनि जनचित्ती। जागविली निर्मल शिवभक्ती।
मन्मथरूपे शिव आले, लावितो 'शेष', भाळी निर्दोष,
धूळ ती मन्मथचरणांची... आरती मन्मथस्वामींची।।३।।

 -शे. दे. पसारकर ('श्रीमन्मथचरितामृत' ओवीबद्ध चरित्रग्रंथ)

No comments:

Post a Comment