Tuesday, 29 April 2014

वचनवाङमय

    वचनवाङमय

                                       बसवराज पाटील लिंगायत सौजन्य एकमत

वचन म्हणजे प्रतिज्ञा वचन म्हणजे आत्मसाक्षीने केलेले निवेदन बोले तैसा चाले ’ तैसा बोले म्हणजे वचन लोकांनी, लोकांच्या कल्याणासाठी लोकांमध्ये राहून लोकांच्या बोलीभाषेतून निर्माण केलेली लोकसंहिता म्हणजेच वचन सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास वचन म्हणजे बोलणे अर्थात हे बोलणे प्रतिज्ञापूर्वक असून बसववादी शरणांचे हेच बोलणे एक शास्त्र म्हणून मान्यता पावले. म्हणून बसववादी शरण हे वचनसाहित्याचे निर्माते होत. शरणांच्या लहान-लहान बोलण्यातून प्रारंभ झालेल्या वचनांनी आज एक धर्मसंहिता किंबहुना लिंगायत धर्मग्रंथ म्हणून मान्यता पावले आहे.
बाराव्या शतकात धर्मशास्त्र कठीण अशा संस्कृत भाषेत बंदिस्त होणे,संस्कृत ही देवनागरी लिपी शिकणे सर्व सामान्यांचा अधिकार नव्हता. संस्कृत भाषेत ज्ञानाची संपदा बंदिस्त झाल्याने फार मोठा समाज ज्ञानापासून वंचित होता. अशा प्रसंगी म. बसवण्णांनी सर्वसामान्यांना समजेल- उमजेल अशा बोली भाषेतून अर्थात कन्नड भाषेतून धर्मसूत्रे अतिशय सोपी आणि सुलभ करून वचनाच्या माध्यमातून सांगितली. बसवण्णांनी बचनाआधारे लोकांना धर्मशास्त्राचा फक्त परिचय करून दिला असे नाही तर भाषे- भाषेतील अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संस्कृत हीच फक्त देवभाषा आणि इतर भाषा द्रविडभाषा किंवा दानवभाषा हा भेद नष्ट केला.
वचनावाङमयातून जनसामान्य लोकांची जागृती उध्दार आणि मार्गदर्शन हाच मुख्य उद्देश असल्याचें दिसून येते. अनाकलनीय अशा सौंदर्यप्रचुर -पांडित्यपूर्ण शब्दांचा वापर न करता किंवा राजे- महाराजे, धनवान गणमान्य व्यक्तींची अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारे स्वार्थी काव्यरचना त्यांनी केली नाही. तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आत्म्याची जाणीव करून देणे त्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात आपले जीवन सार्थकी बनविण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयाण म्हणजे वचनवाङमय होय.
या वचनाचं स्वरून ती अनुप्रास किंवा वृत्ताच्या नियमांनी घट्ट बांधली गेली नाहीत किंवा गद्या प्रमाणेत अति सैल होऊन वाहत गेली नाहीत. तर यात पद्याची लय, नाद आणि गद्याची सरलता आहे. म्हणून ही एकप्रकारची गद्दगीते आहेत. बसवण्णांची वचने याचे एक उत्कृष्ठ उदा. बनले आहे. मुळात बसवण्णा हेच खरे वचन रचनाकार आणि मूळ निर्माते आहेत. ही वचनेहृदयातील भावनेच्या सुगंधाने ओथंबलेली आणि अतिसहज कोणत्याही भाषेतून सुगम गायन बनली आहेत. यात पांडित्यप्रचूर शब्दांचा गोंधळ नाही. दार्शनिक हृदय इथे कवीहृदय बनले आहे. कवी हृदयाने फक्त शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, नवरसपान करणारे काव्य बनविले आहे. तर दार्शनिक हृदयाने त्याच्याही पुढे एक पाऊल टाकत अर्थ- शब्द सौंदर्याच्या रसास्वादाला दैवी भावनेचे सिंचन प्राप्त झाले आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या वचनात लय-अनुप्रास आपोआपच निर्माण झाला आहे. ही वचनसंपदा केवळ एक साहित्यकृतीच नाही तर ती तात्वीक बनली आहेत.
वचन साहित्याचा उगम का? आणि सिा झाला? हे पहिले मोठे उध्बोधक आहे आशिया खंडात सर्वप्रथम सामाजिक, धार्मिक आणि साहित्यीक क्रांती घडून आली ती १२ व्या शतकात कर्नाटकामध्ये. ही बाब भारताच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी नमुद करण्यासारखी आहे. तेव्हाची परिस्थिती पाहता बौध्द धर्माला भारताबाहेर घालविण्यात आणि जैन धर्माला शिथिल करण्यात वैदिक धर्म आणि त्यातील कर्मकांड यशस्वी ठरली. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था पुन्हा भक्कम झाली. अनेक देवोपासना आणि पुरांहितशाहीने आपली पाळेमुळे पुन्हा एकदा समाजात घट्ट रूजवली. अज्ञान, अंधश्रध्दा यांच्या जोडीने दारिद्रय आणि रोगराई गुण्यागोविंदाने नांदू लागली. धर्म, ज्ञान, भाषा (संस्कृती) ही एकाच वर्गाची मक्तेदारी झाली चया सर्वांचा धिक्कार करीत १२ व्या शतकात म.बसवण्णांनी क्रांती घडविली. या क्रांतीचे प्रभावी अस्त्र किंवा हत्यार म्हणजे वचनसाहित्य/ वचनवाङमय होय. या वचनसाहित्याच्या तलवारीला धार दिली ती अनुभवमंटपाच्या ज्ञानपीठातील अनुभवाने. ही क्रांतीची तलवार कन्नड भाषेच्या म्यानात विराजमान झाली. म.बसवण्णाच्या या ‘ वचनरूपी’ परिस्पर्शाने अनेक शरणांच्या विचरांची ज्ञानज्योत प्रज्वलीत केली. अनेक शरणांनी कंठ फुटला. त्या वचन रचनाकार बनल्या. खरच ‘ न भूतो न भविष्यति.’ भारताच्या काना- कोप-यातून आलेल्या शरणांच्या वचनज्योतीने अनुभवमंटप उजळून निघाला संबंण मानवजातीच्या मनात आत्मसाक्षात्काराचा हुंकार घडविणा-या वचनसाहित्याने भारतभुमी उजळून निघाली. मानवजातीच्या कल्याणाच्या दिशेने धर्माची पावले वळू लागली. म. बसवण्णाचे स्थान अनेक कारणांनी अनन्यसाधारण ठरले आहे.त्यांनी स्थापन केलेल्या अनुभवमंटपरूपी ज्ञानर्पणात सर्व जाती, वर्ग,वर्ण, लिंग असा भेदभाव न करता शरण-शरणी एकत्र आल्याचा उल्लेख आयदक्की लक्कम्माच्या वचनातून स्पष्ट होतो.
‘ यांच्या शरणांचे सातशे सत्तर अमरगणांचा प्रसाद घेऊनी जगते आहे’ या वचनातून हे सर्व शरण-शरणी एकत्र बसून आपल्या आत्मज्ञानाबारोबरच अनुभावावर चर्चा करीत. अनुभवमंटपात होणारी ही चर्चा अथवा अभिप्राय शांतरस ( शरण) आणि त्यांच्या हाताखालील कर्णिक ( कारकून) लिहून घेत. त्यावन शून्य पीठाधिकारी अल्लमप्रभूदेव वचनातील त्रूटीदूर करून त्यावर मान्यतेचा मोहोर उमटवीत.त्या वचनाच्या अनेक प्रती तयार करून चरजंगमाला देण्यात येत असे. हे चरजंगम एका गावात एक दिवस व शहरात पाच दिवस मुक्काम करून ती वचने सुगम गायनातून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत. वचन साहित्यांतून प्रबोधनाची जनजागरणाची एक मोठी चळवळ त्याकाळात उभी राहिली होती. ती सामाजिक, धार्मिक, आर्थिक पुनरूज्जीवनाची मोठी क्रांतीच होती. ही वचने ताडपत्रांवर लिपीकार मुद्रित करून ठेवत. हा त्या काळातला एक नवा आविष्कार होता. कारण त्याकाळी शिलालेख, ताम्रपट, मातीच्या विटा यावर अक्षरे कोरली जात पण ताडपत्रावर इतक्या मोठ्या प्रमाणात रचना कोरण्याची प्रक्रिया खरच कौतुकास्पद अशीच होती. याचे सारे श्रेय म.बसवण्णा आणि शरण-शरणींना जाते.
                                                                                              _प्रा. डॉ. प्रभा वाडकर

No comments:

Post a Comment