परिवर्तनाची आरती
बसवन्ना, आता वेळ आलीय
भंगलेल्या समाज मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची,
तुझी लेकर म्हणून आम्हालाच कराव लागणार आहे ते!
त्यासाठी आम्हाला गोळा कराव्या लागणार आहेत,
तुझ्या अनुभव मंटपातल्या ईत तीथ पसरलेल्या सार्या ठिणग्या
किती कोस चालावे लागणार कुणास ठाउक? पण तरीही
आम्ही चालणार आहोत बसवन बागेवाडीतल्या ज्या ठिकाणी थांबून
तू नाकरल होतस मौजीबंधन व्रत
तिथली माती कपाळाला लावून
सुरु करणार आहोत आम्ही आमचा प्रवास
एंगळेश्वराला घालून प्रदक्षिणा
वाटेत थांबणार आहोत मंगळ वेध्याला
शोधणार आहोत तिथ तुझ्या पाउल खुणा,
बसवकल्याणलाही जाणार आहोत,
शरण-शरणी ज्या गविमध्ये रहात होते,
तिथली धूळ अंगाला भस्म म्हणून माखाण्यासाठी.
डोळे भरून पाहणार आहोत तुझा अनुभव मंटप
आणि थेट जाउन थांबणार आहोत , कृष्णा-मलप्रभेच्या संगमवर.
थोड्न बसून त्या पिंपळाच्या झाडाखाली,
आम्ही उतरणार आहोत घाट,
अन घेणार आहोत तीर्थ कुडळसंगामच!
गाणार आहोत परिवर्तनाची आरती.
तेव्हा हजार मुखातून बाहेर पडेल मानवतेचा गंभीर मंत्र घोष,
अन् साजरा होईल , गोपूरंच्या लांबच लांब रांगामधून
आभाळाला भिडणारा घंटानाद.
त्या प्रवाही घंटानदातून तेव्हा उमटतील शब्द
“ येणार युग हे समतेच असणार आहे,
बसवन्नाच्या पुरोगामी विचारांच असणार आहे!”
==========================================================
कवी- चंद्रशेखर मलकपट्टे, उदगीर.
महाराष्ट्र बसव परिषद,भालकी यांनी प्रकाशित केलेया आणि प्रा.बाबुराव
मशाळकर / प्रा.डॉ.ई.म. तंगावार यांनी संपदीत केलेल्या “ बसव सिद्धांत या
ग्रंथातून साभार.
No comments:
Post a Comment