Wednesday, 27 February 2013

शिखर शिंगणापूर

शिंगणापूरची स्थापना शिंगणराजे यादव(१२१० - ४७) या राजाने केली म्हणून यास शिंगणापूर हे नाव दिले आहे. इथल्या डोंगर माथ्यावर एखाद्या शिरपेचा प्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते . हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते तसेच शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील कुलदैवत आहे.
साधारणतः २ एकर परिसरात वसलेल्या या सुंदर मंदिराजवळ पोचण्यास जवळपास १५० पायऱ्या चढून जावे लागते. पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचता येते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपणास समोर नंदी आणि डाव्या बाजूस नगारखाना पहावयास मिळतो. नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वतीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन होते. मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती आशी दोन लिंग आहेत यांची आहेत. शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते.
महादेवाच्या या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती पद्धतीचे आहे. या मंदिरास एक मुख्य आणि तीन उप-प्रवेशद्वार असे एकूण ४ प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या आवारात दोन दीपमळा पाहण्यास मिळतात. मंदिराचे एकूण शिल्पकाम हे अतिशय सुंदर आणि सुबक असून यातून प्राचीन काळातील उत्तम सुबक शिल्पकलेचा अनुभव घेता येतो. इ. स. पूर्व बाराशे शतकातील या मंदिराचे सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला. मंदिराचे छत हे एकूण १८ दगडी खांबावरती स्थित आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर पर्यंत विस्तारित आहे आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थितः आहे शिखराच्या समोर सभामंडपाच्या वरती दोन्ही बाजूस हत्तीचे शिल्प पहावयास मिळते.मंडपामध्ये ३ तांब्या पितळे सजवलेले नंदी आहेत.मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते.
बळी महादेव: मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे. मंदिराचे प्रेवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो. मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे. मुख्य (महादेवाच्या) मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्यातून थोड्या अंतरावर एका टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्या स्मृती स्मारकांचे दर्शन होते. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बंधू शाहू महाराज यांनी या स्मारकाचे बांधकाम केले. यामध्ये अनुक्रमे पश्च्मीमेकडे छत्रपती शिवाजी महाराज, मध्ये शाहू महाराज आणि पूर्वेला संभाजी महाराज अशी स्थित आहेत. मंदिराच्या आवारातून दूरवर एक तलाव दिसतो त्यास पुष्कराज तलाव महणून उलाख्ले जाते याचे बांधकाम शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी कलेले आहे.
यात्रा : १२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडी पाढव्याला होते. पंचमीला पार्वती शंकराला हळद लागते व अष्टमीला रात्री १२ वाजता देवाची लग्न लागते. हि यात्रा महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबनात भरते. कावड हे या यात्रेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध ठिकाणाहून पाणी घेऊन कावडी येतात. या पैकी मनाची कावड ही सासवड इथल्या "भुतोजी तेली" ( तेल्या भूत्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे ) यांची असते. द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोचून दुपारी ही कावड आतिशय अवघड मुंगी घाटातून डोंगरावर चढवली जाते. हा सोहळा हा अतिशय वोलोभनीय आणि रोमांचक आसतो यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तमंडळी तल्लीन होऊन नाचतात तसेच खांद्यावरून नेल्या जाणऱ्या कावडींची नयनरम्य अशी रस्सिखाच देखील खेळली जाते. द्वादशीच्या मध्यरात्री कावडीच्या पाण्याने देवांस अभिषेक घातला जातो.
गुप्तलिंग : शिखर शिंगणापूर पासून जवळच असलेले हे देवस्थान. भगवान शंकर तपश्चर्येला बसले असता माता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन तपश्चर्या भंग केली तेव्हा महादेव क्रोधीत होऊन त्यांनी आपली जटा दगडावर आपटली आणि तिथून पाण्याचा प्रवाह प्रकट झाला हा गोमुखातून पडणारा प्रवाह आजही पाहण्यासा मिळतो. पार्वतीने माफी मागून शंकरास शांती केले आणि पुढे चैत्र शुद्ध अष्टमी शिखर शिंगणापूर येथे त्यांचा विवाह झाला.
या मंदिराजवळ पायऱ्या उतरून जावे लागते. या ठिकाणाचे दर्शन केल्या नंतरच शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.

अशा या ठिकाणास भेट देऊन या ठिकाणाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव नक्कीच जाणून घ्या.

श्री शंकराची आरती

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा,
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी बाळा,
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा,
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा,
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥
देवी दैत्यी सागरमंथन पै केले,
त्यामाजी अवचित हळहळ जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले,
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी,
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी,
रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

English Translation

The fierce Lord (Rudra) who dances with a fierce appearance, He whose neck is darkened because of the Hālāhala poison, who sports a fiery third eye (on His temple), His matted locks where one can glimpse the beautiful face of celestial Devī Gaṅgā, so that her sheer force would not destroy the earth. ||1||
Praise the Lord Śrī-Śaṅkara! We offer an aratī to You, whose skin art fair as camphor. ||धृ०||
The fair one is (very) simple and honest with big eyes, Whose consort Parvati occupies one half of His body (Ardhanārīśvara), Who is adorned with a garland of (fragrant) flowers, He who adorns Vibhūti (ashes) which is besmeared all over his body, and sports a blue neck. Like that, Śaṅkara is the beloved of Umā.||2||
Praise the Lord Śrī-Śaṅkara! We offer an aratī to You, whose skin art fair as camphor. ||धृ०||
When the Gods and the demon churned the ocean, all of a sudden emerged the deadly Hālāhala poison capable of incenerating the whole universe. Happily without hesitation, Lord Śankara drank this deadly poison (out of the great compassion for all the creatures since none was capable of withstanding the deadly venom), and thus became wellknown as Nīlakaṇṭha, the dark throated one (since the poison was stopped by the divine mother Umā at the throat). ||3||
Praise the Lord Śrī-Śaṅkara! We offer an aratī to You, whose skin art
fair as camphor. ||धृ०||
The adorer of tigerskin as garment, the great serpent (Vāsuki) as ornament, and the destroyer of Madana (Manmatha – or the god of love), The five faced one who who is all attractive and the beswower of peace upon the sages. Even with innumerable bījas , When (I), the servant of the the scion of the lineage of Raghu, Rama – Ramadāsa utter (in the mind), this is but enough to describe/glorify the great Lord Śaṅkara.||4||
Praise the Lord Śrī-Śaṅkara! We offer an aratī to You, whose skin art
fair as camphor. ||धृ०||

श्रीशंकराचे पवित्र प्रतीक-शिवलिंग

श्रीशंकराचे पवित्र प्रतीक-शिवलिंग

साधारणतः साधक आपल्या उपास्य दैवताच्या पुजाअर्चनेसाठी मुर्ती अथवा तसबीर वापरतात. श्रीशंकराची उपासना मात्र सगुण आणि निर्ग़ुण अशा दोन्ही रुपात केली जाते. शिवशंकराची मुर्ती वा तसबीर शिवोपासनेत सगुण प्रतीक म्हणून वापरली जात असली तरी खर्‍या अर्थाने शिवलिंग हेच शंकराचे प्रतीक मानले जाते. बहुतेक सर्व शिव मंदिरांमधे शिवलिंगाच्या निर्ग़ुण प्रतीकाच्या माध्यमातूनच शंकराची पूजा केली जाते. शंकराची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्धच आहेत. शिवलिंगाचा अर्थ काय, त्याचा उगम कसा झाला, त्याचे पूजन कसे करावे या विषयी शिवपुराणामधे सविस्तर वर्णन आढळते. त्या आधारानेच आपणही या गोष्टी जाणून घेणार आहोत...
सृष्टीच्या आरंभापूर्वी सर्वकाही निर्ग़ुण निरामय ब्रह्मच होते. हे ब्रह्म सत्य, ज्ञानस्वरूप, आधाररहित, निर्विकार, निराकार, निर्ग़ुण, योहिगम्य, सर्वव्यापी, निर्विकल्प, निरारम्भ, मायाशून्य, उपद्रवरहित, अद्वितीय, अनादी, अनंत, संकोच-विकास रहित आणि चिन्मय असे एकटेच पहुडले होते. हे ब्रह्म शैव दर्शनात परमशिव म्हणूनही ओळखले जाते. अशा या निर्ग़ुण ब्रह्मतत्वाच्या मनात आपण अनेक व्हावे अशी इच्छा निर्माण झाली. त्याबरोबर ते निर्ग़ुण तत्व सगुण झाले आणि सदाशिवाच्या रूपात प्रगट झाले. सदाशिवाने आपल्याच इच्छेने शक्तितत्वाची निर्मीती केली. शिव आणि त्याची शक्ती क्षणभरसुद्धा एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. जेथे शिव तेथे शक्ती आणि जेथे शक्ती तेथे शिव असा प्रकार आहे. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. या शक्तीलाच जगदंबा, अंबिका, प्रकृती, सर्वेश्वरी, त्रिदेवजननी, नित्या, मूलकारण अशा अनेक नावांनी ओळखले जाते. शिव आणि शक्ती आपल्याच लीलेने क्रिडा करू लागले.
क्रिडा करत असताना त्यांच्या मनात आले की आता अजूनही सृष्टी निर्माण करावी. पण सृष्टीनिर्मीतीच्या कार्यामुळे आपल्या क्रिडेत भंग यायला नको म्हणून अन्य कोणाची तरी नियुक्ती या कामी करावी असे उभयतांनी ठरवले. त्यानुसार सदाशिवाने आपल्या डाव्या अंगातून एका तेजस्वी पुरुषाची निर्मीती केली. त्या तेजस्वी पुरुषाला शिवाने विष्णु असे नाव दिले. जगाची रचना करण्याचे ज्ञान विष्णुला मिळावे म्हणून शिवाने स्वासावाटे वेद विष्णुला प्रदान केले. त्यानंतर विष्णु कठोर तप करू लागला. तपस्येच्या श्रमाने त्याच्या शरीरातून घाम अर्थात जलधारा वाहू लागल्या. सर्वत्र ते जल भरून राहिले. थकलेल्या विष्णुने त्यातच दिर्घकाळ निद्रा घेतली. जल शब्दाला एक प्रतिशब्द आहे 'नार' आणि त्यात शयन करणारा तो 'नारायण'.
नारायण निद्रेत असताना सदाशिवाच्या इच्छेने त्याच्या नाभीतून एका कमळाचा उद्भव झाला. ते कमळ अतिशय सुंदर होते. तेजस्वी आणि प्रकाशमान होते. त्या कमळावर शिवइच्छेनुसार ब्रह्मदेवाचा जन्म झाला. विष्णुची उत्पत्ती शिवाच्या डाव्या अंगातून झाली तर ब्रह्मदेवाची उजव्या अंगातून. जन्म झाल्याबरोबर ब्रह्मदेवाला आपण कोठून आलो? आपले कार्य काय? असा प्रश्न पडला. आपला जन्म या कमळातून झाला आहे तेव्हा या कमळाचे मुळ शोधले पाहिजे असे समजून ब्रह्मदेव कमळाच्या मुळाशी पोहोचला. त्याला असे दिसले की ते कमळ विष्णुच्या नाभीतून प्रसवलेले आहे. विष्णुने ब्रह्मदेवाला पाहिले आणि ब्रह्मदेवाने विष्णुला. दोघांनीही एकमेकांना प्रणाम केला. विष्णुने ब्रह्मदेवाला 'मुला' असे संबोधताच ब्रह्मदेवाला राग आला. दोघांमधे मी श्रेष्ठ की तु श्रेष्ठ असे भांडण सुरू झाले. बराच काळ भांडण सुरू होते पण वादाचा निकाल काही लागेना. त्याचवेळेस त्या दोघांमधे एक अत्यंत तेजस्वी अग्निस्तम्भ प्रगट खाला. दोघांनाही हे कळेना की आपल्या भांडणात हा तिसरा कोण आला. तो अग्निस्तम्भ अतिशय विशाल होता. त्याची सुरवात आणि शेवट कोठे आहे हेच त्या दोघांना कळत नव्हते. तेव्हा त्यानी असे ठरवले की ब्रह्मदेवाने स्तंभाच्या वरच्या भागाचा उगम शोधावा आणि विष्णुने खालच्या भागाचा. त्यानुसार दोघेही त्या अग्निस्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यासाठा वेगाने निघाले. बराच काळ व्यतीत झाला पण त्या स्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यात त्यांना अपयश आले. अत्यंत थकून दोघेही आपापल्या मुळ जागी परत आले. त्यांना कळले की ना विष्णु श्रेष्ठ आहे ना ब्रह्मदेव. त्यांनी त्या अग्निस्तंभाला भक्तीभावाने नमस्कार केला आणि प्रार्थना केली 'हे महाप्रभो! आपण कोण आहात ते आमच्या आकलनापलिकडचे आहे. कृपया आपली यथार्थ ओळख द्या'. या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे अवतीर्ण झाले.  सदाशिव म्हणाले, "मी सृष्टीकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहे. निर्ग़ुण आहे आणि सगुणही. सत-चित-आनन्द हे माझे खरे रूप आहे. विष्णु माझ्या डाव्या अंगापासून निर्माण झाला आहे तर ब्रह्मा उजव्या अंगापासून. माझ्या आज्ञेने ब्रह्माने सृष्टीच्या निर्मीतीचे कार्य करावे तर विष्णुने पालनाचे. सृष्टीचा संहार करण्याचे काम माझाच प्रत्यक्ष अंश रुद्र रूपाने करेन. रुद्र ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटी मधून प्रगटेल." असे सांगून शिव अंतर्धान पावला. शिवाज्ञा शिरसावन्द्य मानून ब्रह्मा आणि विष्णु आपापल्या नेमून दिलेल्या कार्यात मग्न झाले. विष्णु आणि ब्रह्मदेवाच्या वादाच्यावेळी जो अग्निस्तंभ प्रगट झाला तो म्हणजेच शंकराचे पवित्र शिवलिंग आणि शिवलिंग ज्या दिवशी प्रगट झाले तो दिवस म्हणजेच शिवरात्रीचा पावन दिवस!
नाथयोग शिरोमणी श्रीगोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध-सिद्धांत पद्धती नामक ग्रंथात (जो नाथ पंथाचे तत्वज्ञान विशद करणारा अतिशय महत्वाचा प्रमाण ग्रंथ आहे) एकटे शिवतत्वच या जगदनिर्मीतीला कसे कारणीभूत आहे ते सांगताना शिव ते ब्रह्मदेव ही स्थुल उत्क्रांती शिव - भैरव - श्रीकंठ - सदाशिव - इश्वर - रुद्र - विष्णु - ब्रह्मदेव अशा प्रकारे दिली आहे. येथे रुद्र शिवतत्वाचा प्रत्यक्ष अंश असल्याने विष्णुच्या आधी आला आहे हे लक्षात घ्यावे.
कुंडलिनी योग साधकांनी येथे काही गूढ संकेत लक्षात घ्यावेत. शंकराने विष्णुला वेद स्वासातून देणे आणि अजपा साधनेचे शैव दर्शनातील महत्व हा दुवा महत्वाचा आहे. तसेच शिव-शक्ती अभिन्नत्व आणि योगग्रंथातील 'मुलाधारात शिवच शक्तीरूपात राहतो' अशा सारखे श्लोक एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे सांगत आहेत हे लगेच समजण्यासारखे आहे. षटचक्रांमधे स्वयंभू, बाण इत्यादी शिवलिंगांची केलेली कल्पनाही महत्वाची आहे. योगशास्त्रानुसार स्वाधिष्ठान चक्रात ब्रह्मदेवाची, मणिपूरात विष्णुची आणि अनाहत चक्रात रुद्राची केलेली कल्पनाही महत्वाची आहे. ब्रह्मदेवाचे निर्मीतीचे कार्य आणि प्रजनन इंद्रियांचा जवळचे स्वाधिष्ठान चक्र, विष्णुचे पालनाचे कार्य आणि मणिपुर चक्राचे उदरसंस्थेवरचे नियंत्रण, रुद्राचा संहार आणि हृदयातील षडरिपूंचा आणि भौतिक भावभावनांचा नाश, रुद्राचे भ्रुकुटीमधून प्रगटणे आणि आज्ञा चक्राचे महत्व या सर्वच गोष्टी एकमेकाशी अगदी चपलख जोडता येतात. असो.
ही झाली शिवलिंगामागची पौराणिक कथा. 
आता शिवलिंगाच्या तात्वीक आणि आध्यात्मिक अर्थाकडे वळू. तुम्ही कोणत्या न्या कोणत्या देवळात शिवलिंग पाहिलेच असेल. शिवलिंगाचे दोन भाग असतात. एक जो उभट स्तंभासारखा दिसतो तो आणि दुसरा जो पसरट दिसतो तो. पहिला भाग म्हणजे लिंग आणि दुसरा भाग म्हणजे योनी. या दुसर्‍या भागाला पीठ, वेदिका, जलधारा, जलहरी असेही म्हणतात. येथे लिंग आणि योनी म्हणजे शरीरावयव नव्हेत तर त्यांना शैव दर्शनामधे एक गूढ सांकेतीक अर्थ आहे.
शिवपुराणातच हा अर्थ विषद करण्यात आला आहे.

लिंगमर्थं हि पुरुषं शिवं गमयतीत्यदः।
शिवशक्त्योश्च चिन्ह्यस्य मेलनं लिंगमुच्यते॥

याचा अर्थ असा की शिवलिंगामधील लिंग म्हणजे शिव आणि योनी म्हणजे शक्ती. अर्थात शिवलिंग शिवशक्ती यांचे मिलन आणि एकता दर्शवते. लिंग म्हणजे वैश्वीक पुरुषतत्व आणि योनि म्हणजे वैश्वीक स्त्रीतत्व अर्थात प्रकृती. शैव मतानुसार ही सारी सृष्टी शिव आणि शक्ती यांचा खेळ आहे. शिव आणि शक्ती एकमेकाहून भिन्न राहुच चकत नाहीत. किंबहुना शिव आणि शक्ती हे खरेतर भिन्न नाहितच तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यालाच अद्वयवाद असे म्हटले जाते. अर्धनारीनटेश्वर या अद्वयवादाचेच प्रतीक आहे. आपल्याकडे पत्नीला अर्धांगीनी म्हटले जाते ते याच अर्थाने. संसाराचा गाडा दोघांनी एकत्र ओढल्याशिवाय चालूच शकत नाही हे त्यातून अभिप्रेत असते. अद्वयवाद अद्वैतवादापेक्षा भिन्न कसा याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही पण थोडक्यात सांगायचे तर अद्वैतवादात शक्ती वा माया हीचे अतित्वच नसते. ती दोरीवरील सर्पाच्या आरोपाप्रमाणे मित्थ्या मानली जाते. अद्वयवादात मात्र परमेश्वर आणि त्याची शक्ती हे दोनही सत्य असून त्यांचे नाते चन्द्र आणि चांदणे, दिप आणि प्रकाश यांच्यासारखे अभिन्नत्वाचे असते. भगवत गीतेतही हेच तत्व थोड्या निराळ्याप्रकारे सांगितले आले. गीता 'पुरुष आणि प्रकृति ही अनादी तत्वे आहेत' असे ठामपणे सांगते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात :
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन गर्भं दधाम्यहम।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत॥
म्हणजेच "प्रकृती माझी योनि आहे. तीच्यामधे मी गर्भधारणा करतो. त्यापासूनच सर्व भूतांची उत्पत्ती होते." असे हे शिवलिंग. शिवशक्ती ऐक्याचे पवित्र चिन्ह. शिवलिंगाचे श्रेष्ठ्त्व आणि पावित्र्य असे आहे की पांडुरंगानेही ते आपल्या शिरावर धारण केले आहे. 
श्रीधरकवीच्याच ओवीबद्ध भाषेत सांगायचे तर -
श्रीधरवरद पांडुरंग। तेणें शिरी धरिले शिवलिंग।
पूर्णब्रह्मानन्द अभंग। नव्हे विरंग कालत्रयी ॥
सदा शिवचरणी लीन
veershaiv dharm 

शिवनामाचा महिमा

शिवनामाचा महिमा

हठयोग्यांना नाना प्राणायाम, बन्ध, मुद्रा करूनही सदाशिवाचे नखसुद्धा दृष्टीस पडत नाही. नेति नेति करणार्‍या कोरड्या वेदांत्यांनाही त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे ज्याला शोधून शोधून थकली. असा हा भोळा सांब सदाशिव सापडतो भक्ताच्या हृदयात. खर्‍या भक्ताला सोडून तो जाता जात नाही. त्याची रहायची जागा भक्तीच्या मुलाम्याने लिंपलेली असावी लागते. हार तुर्‍यांकडे तो ढुंकुन देखील पहात नाही. भक्ताचा भाव हीच काय ती पहायची गोष्ट त्याला ठावूक आहे. श्रीमंती त्याला विकत घेऊ शकत नाही. त्या श्रीकर नामक गोपबाळाने त्याची पुजा केली. कशाने तर दगड माती यांनी आणि हा थेट त्याच्यापुढे आशिर्वाद द्यायला प्रगट झाला. भक्त दिसला की मग त्याच्याने राहवतच नाही. मग तो भक्त कसाही असो. त्याला प्राप्त करायचे असेल तर योगसाधनेला भक्तीरसात ओथंबून काढले पाहिजे आणि त्यासाठी नामस्मरण हा सोपा मार्ग आहे. 'शब्दां'चा मारा केला की देव 'काकुळती'ला आलाच पाहिजे हा महाराष्ट्रातील संतपरंपरेने सर्वांना सांगितलेला सिद्धांत आहे. नामाचा जप हाच पुढे सोहंरूपी अजप कसा बनतो ही अनुभवाची गोष्ट आहे. संतांच्या या शिकवणीचे अनुसरण करत सामान्य जीवही तरून जातो मग योगसाधक तरला जाणार नाही हे शक्य तरी आहे का?
शिवशंकराच्या सर्व मंत्रांत श्रेष्ठ आणि सर्वात अधिक प्रचलित असलेला मंत्र म्हणजे पंचाक्षर मंत्र. पंचाक्षर मंत्र एवढा प्रसिद्ध आहे की तो सांगण्याची गरजच नाही. या मंत्राचे महात्म्य आणि श्रेष्ठत्व प्रसिद्ध शिवभक्त उपमन्युने श्रीकृष्णाला शिवपुराणात विस्ताराने सांगितले आहे.

शिव-पार्वती संवादरूपाने ते शिवपूराणाच्या वायवीय संहितेमध्ये आलेले आहे. आपणही ते जाणून घेण्याचा प्रयत्न येथे करणार आहोत...

पार्वती शंकराला म्हणाली, "महेश्वर! कलुषित अशा कलियुगात जेव्हा सारा संसार धर्मापासून विन्मुख होईल, पापरूपी अंधाराने ग्रासला जाईल, वर्ण आणि आश्रम व्यवस्था नष्ट होईल, धर्मसंकटे उपस्थित होतील, गुरू-शिष्य परंपरा नामशेष होण्याचा मार्गावर लागेल अशा वेळी साधक कोणत्या उपायाने मुक्ती प्राप्त करू शकेल?"
शंकर उत्तरला, "देवि! कलियुगात मनुष्य माझ्या पंचाक्षरी विद्येचा आश्रय घेऊन माझी भक्तीपूर्वक सेवा करून संसार बंधनातून मुक्त होईल. मानसिक, वाचिक आणि शारीरिक दोषांनी युक्त, कृतघ्न, निर्दय, कपटी, लोभी माणसांनीसुद्धा जर माझी भक्ती करत पंचाक्षरी मंत्राचा जप केला तर त्यांच्यासाठीसुद्धा ही विद्या तारक ठरेल. मी वारंवार प्रतिज्ञापूर्वक हे सांगितले आहे की भुतलावरील माझा अत्यंत पतित भक्तसुद्धा पंचाक्षरी विद्येद्वारा मुक्त होऊ शकतो."
यावर देवि विचारती झाली, "शास्त्र असे सांगते की जर मनुष्य पापी असेल तर त्याचे कर्म त्याला नरकप्राप्तीच करून देते. अशा स्थितीत पंचाक्षरी विद्येद्वारा तो मुक्त कसा होईल?"
शंकर म्हणाला, "देवि! ही तु फार चांगली गोष्ट विचारलीस. नीट ऐक. पूर्वी मी हा विषय अत्यंत गूढ असल्याने प्रगट केला नव्हता. जर पापी मनुष्य मोहवश अन्य कुठल्या मंत्राचा जप करेल तर तो आपल्या कर्मांनुसार निःसंदेहपणे नरकातच जाईल. पण पंचाक्षर मंत्राला हे बंधन नाही. जे केवळ जलपान करून वा वायू भक्षण करून तप करतात, नाना व्रतांद्वारे आपले शरीर सुकवतात त्यांना शिवलोकाची प्राप्ती दुर्लभ आहे (व्रतं यम-नियमांचा एक अविभाज्य घटक असली तरी केवळ व्रतंवैकल्ये करून शिवप्राप्ती होत नाही असा अर्थ). पण जे भक्तीपूर्वक पंचाक्षर मंत्रासहित माझे पुजन करतात ते या मंत्राच्या सामर्थ्याने माझ्या लोकात पोहोचतात. म्हणून तप, व्रत, यज्ञ इत्यादी गोष्टी पंचाक्षर मंत्रासहित केलेल्या माझ्या पूजनापूढे तुच्छ ठरतात. जो साधक, मग तो पुण्यवान असो वा पापी, माझे पंचाक्षर मंत्रासहित पूज केल्याने मुक्तच होतो. साधकाने कामक्रोध आवरून या मंत्राचा जप करावा. मंत्र दीक्षा घेतलेला साधक मंत्र दीक्षा न घेतल्या साधकापेक्षा कोटी-कोटी पट श्रेष्ठ आहे. म्हणून गुरूकडून दीक्षा घेऊन मगच हा मंत्र जपावा. जो असे करतो तो माझ्या समान होतो. या विषयी अधिक बोलून काय लाभ? माझ्या पंचाक्षर मंत्रात सर्व प्रकारच्या भक्तांचा अधिकार आहे. पंचाक्षर मंत्राच्या प्रभावानेच वेद, महर्षि, सनातनधर्म, देवता आणि हे चराचर जगत टिकून आहे.
देवि! प्रलयकाळी जेव्हा सारे जग लय पावते आणि हा सारा प्रपंच प्रकृतिमध्ये लीन होतो तेव्हा मी एकटाच शिल्लक राहतो. त्यावेळी समस्त देवता आणि शास्त्रे पंचाक्षर मंत्रात सुप्तावस्थेत राहतात. मग पुन्हा माझ्यापासून प्रकृति आणि पुरुष यांच्यासह ही सृष्टी निर्माण होते.
देवि! ज्याची जशी कुवत असेल, ज्याला जेवढा वेळ मिळेल, ज्याची जशी बुद्धी, शक्ती, संपत्ति, उत्साह आणि पात्रता असेल त्याने त्याप्रमाणे माझी पुजा आणि जप केला तर त्याला मोक्ष अवश्य प्राप्त होतो. सुंदरी! माझ्यामधे मन लावून साधक जे काही करेल (चांगले अथवा वाईट) ते मला प्रिय आहे. परंतू त्याने लोकाचरणार्थ बनविलेल्या नियमांचे पालन अवश्य केले पाहिजे.
साधकाने प्रथम तत्ववेत्ता आचार्य, जपशील, सद्गुणसम्पन्न आणि ध्यानयोगपरायण अशा गुरूला शरण जावे. त्यानंतर गुरूला मंत्र देण्याविषयी विनंती करावी. गुरूप्रदत्त मंत्र आणि ज्ञान ग्रहण करावे. मंत्र सुसिद्ध, सिद्ध आणि साध्य अशा तीन प्रकारचा असतो. सिद्ध गुरूकडून प्राप्त झालेला मंत्राला सुसिद्ध म्हणतात, जो गुरू अजून सिद्ध नाही त्याच्याकडून घेतलेल्या मंत्राला सिद्ध मंत्र म्हणतात. जो मंत्र गुरूकडून न घेता केवळ पारंपारीक माहितीच्या आधारे (पुस्तके वगैरे) जपला जातो त्याला साध्य मंत्र म्हणतात. (साध्य मंत्र सिद्ध आणि सुसिद्ध मंत्रापेक्षा कनिष्ठ मानला जातो. म्हणूनच त्याला 'साधकाला स्वप्रयत्नाने साध्य करावा लागणारा' अर्थात 'साध्य' असे म्हणतात. सिद्ध आणि सुसिद्ध हे गुरूद्वारे चैतन्य जागृत करून देण्यात आलेले असल्याने श्रेष्ठ असतात.) 
गुरूमुखातून मंत्र प्राप्त झाल्यानंतर रोज न चुकता ठरावीक संख्येने जप करावा. कमीतकमी 1008 एवढा जप तरी करावाच. जो असे करतो तो परम गति प्राप्त करतो. मंत्रात जेवढी अक्षरे असतील त्यांच्या चौपट संख्येने जप केल्यास एक पुनश्चरण होते. जो पुनश्चरण करून मग नित्य जप करतो त्यासारखा पुण्यवान जगात दुसरा कोणीही नाही.
साधकाने पवित्र ठिकाणी स्नान करून माझे, तुझे (पार्वतीचे) आणि गुरूंचे ध्यान करावे. उत्तर अथवा पूर्व दिशेला तोंड करोन आसनस्थ व्हावे. एकाग्र चित्ताने न्याससहित जप करावा. मानस जप उत्तम प्रतीचा आहे, उपांशु जप मध्यम तर वाचिक जप कनिष्ठ प्रतीचा मानला जातो. मोठ्याने जप करणे म्हणजे वाचिक जप होय. यामधे केवळॅ ओठ आणि जीभ हलते आणि अगदी अस्पष्ट असा ध्वनी येतो तो उपांशू जप होय. ज्यावेळी मंत्र मनातल्या मनातच उच्चारला जातो त्या वेळी तो मानस जप म्हटला जातो. वाचिक एक पटच फळ देतो. उपांशु जप शम्भरपट तर मानसिक जप हजारपट अधिक फलदायी असतो. सगर्भ जपाचे फळ मानस जपापेक्षा हजारोपट अधिक असते. सगर्भ जप म्हणजे प्राणायामपूर्वक केला गेलेला जप. सगर्भ जपापेक्षा ध्यानासहित केला जाणारा जप सहस्रपटींनी अधिक फळ देतो.
आसनाशिवाय, झोपून, चालताना, बोलताना, उभे राहून जप करू नये (हा नियम मुख्यतः पुनश्चरणाला लागू आहे. नामस्मरणाला नाही). रस्त्यावर वा उघड्या जागेत, अपवित्र ठिकाणी, अंधारात जप करू नये. चिंतामग्न असताना जप करू नये. वरील नियमांचे शक्य तेवढे पालन करावे. शक्य नसल्यास जेवढे शक्य आहे तेवढे करावे.
देवि! ज्याची माझ्यावर, माझ्या मंत्रावर आणि आपल्या गुरूंवर श्रद्धा असते त्याने केलेला जप कधीही निष्फळ जात नाही. म्हणून अन्य विघ्नयुक्त मंत्रांचा त्याग करून विद्वान पुरुषांनी साधात परमविद्या असलेल्या पंचाक्षरी मंत्राचा आश्रय घ्यावा. दुसर्‍या मंतांच्या सिद्ध होण्याने पंचाक्षरी सिद्ध होत नाही. परंतु पंचाक्षरी सिद्ध झाल्याने इतर सर्व मंत्र सिद्ध होतात. ज्याप्रमाणे अन्य देवांची भक्ती केल्याने ते ते देव प्राप्त होतात पण मी प्राप्त होत नाही पण माझी प्राप्ती केल्यावर मात्र सर्व देव प्राप्त होतात त्याचप्रमाणे पंचाक्षरी मंत्राचेही आहे. अन्य मंत्रांत जे दोष संभवतात ते यात नाहीत. परंतु छोट्या छोट्या तुच्छ फलांसाठी हा मंत्र वापरू नये कारण हा मंत्र महान फळ देणारा आहे."
तर असा हा शिव पंचाक्षर मंत्र. शिव या नावाचा अर्थच मुळात शुभ, मंगलकारी, कल्याणकारी असा आहे. सर्व पापांचा नाश करणारी अशी ही दोन अक्षरे जेव्हा नमन भावाने जपली जातात तेव्हा साधकाला मोक्ष प्रदान करतात. उगाच नाही पद्मपुराण सांगत -
अशुचिर्वा शुचिर्वापि सर्वकालेषु सर्वदा।
नामसंस्मरणादेव संसारान्मुच्यते क्षणात॥
जो मनुष्य पवित्र वा अपवित्र असा विचार न करता सदा-सर्वदा नामस्मरणात दंग रहातो तो लवकरच संसार सागरातून तरून जातो अर्थात मुक्त होतो.
नामस्मरणाबद्दल अनेकदा अशी तक्रार एकायला मिळते की आम्ही अनेक वर्षे नामजप केला पण काही फायदा झाला नाही. असे होण्यास खालील कारणे असू शकतात:
  • नामजप कसा करावा याचेही एक शास्त्र आहे. केवळ माळा ओढणे म्हणजे जप नव्हे. हे शास्त्र आपापल्या गुरूकडून किंवा ज्यावर विश्वास आहे अशा तज्ञाकडून नीट समजावून घ्यावे.
  • केवळ पुस्तकांत वाचून वा CD / DVD द्वारे ऐकून मंत्र जप केल्यास तो मंत्र 'साध्य' मंत्र असतो हे लक्षात घ्यावे. त्यामुळे फायदा होण्यास बराच वेळ लागू शकतो.
  • आपली पूर्वकर्मे आणि या आयुष्यातील कर्मे या कामी अडथळा आणू शकतात. एकीकडे मंत्र शुद्धी करत असतो तर दुसरीकडे साधक वाईट संस्कारांची पुटे च्या पुटे मनावर चढवत असतो.
वरील पैकी पहिल्या मुद्द्याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही. उरलेल्या दोन मुद्द्यांचे महत्व नीट कळावे म्हणून दोन छोट्या गोष्टी सांगतो.

एकदा एक साधक तपश्चर्येला बसला. अनेक महिने त्याची कठीण तपस्या चालू होती. त्याचे तप पाहून जवळच्याच एका आश्रमात राहणारे ऋषीश्वर प्रसन्न झाले. त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, "बाळा! तु का बरे तप करत आहेस? तुझी तपस्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. काही इच्छा असेल तर माग." त्यावर तो साधक म्हणाला, "मुनीवर! मला अशी शक्ती द्या की मी स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वीवर कोठेही क्षणात अवकाश गमन करू शकेन." यावर ऋषींनी त्याच्या उपरण्याला एक बेलाचे पान बांधले ज्यावर त्यांनी काही मंत्र लिहिला होता. ते पान आणि मंत्र जोवर आहे तोवर त्याला अवकाश भ्रमण करता येईल असा आशिर्वाद दिला. साधक आनन्दी झाला. असे अनेक महिने लोटले. एकदा त्या साधकाने कुतुहल म्हणून आपल्या उपरण्याची गाठ सोडली आणि ते बेलाचे पान पाहिले. त्या पानावर गन्धाने 'ॐ श्रीराम' असे लिहेलेले होते. तो साधक स्वतःशीच हसला. म्हणाला, "मी पण काय मूर्ख आहे! हा मंत्र तर मला माहित होता. उगाचच मी तप केले अन त्या ऋषींकडून वर घेतला." अनेक दिवस झाल्यामुळे ते बेलाचे पान जीर्ण झाले होते. साधकाने ते नदीत फेकून दिले. एका नव्या बेलाच्या पानावर स्वतःच गन्धाने 'ॐ श्रीराम' असे लिहिले आणि ते पान उपरण्यात बांधले. पण कसचे काय! त्याला पूर्वीसारखे अवकाश भ्रमण काही करता येईना. तो परत त्या ऋषींकडे गेला. हात जोडून त्याने घडला प्रसंग सांगितला. त्यावर ते ऋषी म्हणाले, "मुर्खा! मी तुला मंत्र चैतन्याने भारून ते बेलाचे पान दिले होते. तु अजाणतेपणी माझ्या मंत्राचा अपमान केलास. आता मी पुन्हा काही ते पान देऊ शकणार नाही." तो साधक पश्चात्ताप करत, स्वतःला दोष देत परत तपश्चर्येला बसला. साधकाला नेहमी गुरूमुखातून नाम घ्यावे असे सांगण्यात येते ते या कारणासाठी.
आता दुसरी गोष्ट सांगतो. एकदा एक गायत्री उपासक गायत्री पुनश्चरण करावयास बसला. तो संसारी होता तेव्हा काही सांसारीक इच्छा मनात धरून त्याने पुनश्चरण आरंभले. पुनश्चरण पूर्ण करूनही त्याला कोणताही फायदा झाला नाही. उलट पक्षी आयुष्यात काही वाईट घटनाच अनुभवास आल्या. आपल्या कडून काही चुकले असेल अशी कल्पना करून त्याने परत पुनश्चरण करण्याचे ठरवले. दुसरे पुनश्चरण केल्यानंतरही त्याला कोणताच फायदा झाला नाही. संकट येतच होती. न कंटाळता त्याने एका पाठी एक अशी तेवीस पुनश्चरणे केली. परंतू गायत्रीचे दर्शन तर सोडाच पण साध्या साध्या इच्छाही पूर्ण झाल्या नाहीत. शेवटी तो संसाराला आणि कटकटींना वैतागला. त्याने काशीला जावून सन्यास घेतला. गायत्री उपासनेची आवड अजुनही त्याच्या मनात टोकून होती. त्याने चोवीसावे पुनश्चरण करण्यास प्रारंभ केला. पुनश्चरण पूर्ण झाले आणि काय आश्चर्य! गायत्री माता त्याच्या समोर प्रगट झाली. "काय हवे ते माग" असे म्हणाली. त्यावर त्या साधकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो म्हणाला, "माते! आज मी सन्यास घेतलाय. मला आता काही नको. पण मला एक सांग मला जेव्हा गरज होती तेव्हा तु का आली नाहीस. माझ्या इच्छा पूर्ण का केल्या नाहीस?" स्मित हास्य करत देवि उत्तरली, "बाळा! तुम्ही माणसं केवळ एकाच जन्माचा विचार करता. हे बघ." असे म्हणत देवीने आपली बोटे त्याच्या डोळ्यांवर ठेवली. साधकाला असे दिसले की तेवीस पर्वत भस्म होऊन पडले आहेत. देवी पुढे म्हणाली, "तु पहिले पुनश्चरण पूर्ण केल्यानंतर मी तुझ्याकडे येण्यास निघाले होते. तुझ्या पूर्वजन्मीच्या पापांचे पर्वत एवढे होते की मला वाटच मिळेना. एकेका अनुष्ठानानंतर पापांचा एक एक पर्वत मी दग्ध करत होते. ज्यावेळी तु सन्यास घेऊन निष्काम बुद्धीने अनुष्ठान केलेस तेव्हा तुझी उरलेली पापेही जळून गेली आणि मला तुझ्याकडे येता आले."
तात्पर्य हे की गुरूमुखातून नाम जरी घेतले तरी प्रत्येक साधकाच्या कर्मसंचयानुसार ते फलित होते. कोणाला त्वरीत अनुभव येईल तर कोणाला सारे आयुष्य घालवावे लागेल. जरी एखाद्याला काही आध्यात्मिक अनुभव आले नाहीत तरी त्याने हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की योग्य प्रकारे केलेले नामस्मरण आतल्याआत सुक्ष्म स्तरावर संस्कारक्षय करत असतेच. ज्याप्रमाणे पाण्याचे तापमान 100 डिग़्री झाले की त्याला उकळी फुटतेच त्याचप्रमाणे योग्य वेळ आली की आध्यत्मिक प्रगती होतेच होते. महत्वाचे आहे ते न कंटाळता, श्रद्धा न सांडता साधनारत रहाणे.
या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.

सदा शिवचरणी लीन, 
veershaiv dharm 

शिवभक्ताचे आचरण

शिवभक्ताचे आचरण

प्रत्येक शिवभक्ताला आपले आध्यात्मिक आचरण कसे असावे ते माहित असणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आजच्या काळाला अनुसरून सर्वसामान्य संसारी आयुष्य जगणार्‍या शिवभक्ताचे आचरण कसे असावे ते थोडक्यात येथे देत आहे. 
  • प्रत्येक शिवभक्ताने आपल्या घरात शिवलिंगाची पुजा अवश्य करावी. हे शिवलिंग पाषाण, धातू, स्फटीक अथवा पारद यांपासून बनलेले असावे. श्रीशंकाची तसबीर असो वा नसो पण शिवलिंग जरूर पुजनात ठेवावे. शिवलिंग पुजन करत असताना त्याचा तात्विक अर्थ लक्षात घ्यावा.
  • शिवभक्ताची दोनच आभुषणे असतात - रुद्राक्ष आणि भस्म. आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तर दोन रुद्राक्षाच्या माळा जरूर बाळगाव्या. एक परिधान करण्यासाठी आणि एक जप करण्यासाठी. रुद्राक्षाचे शरीरावरील सुपरिणाम आधुनिक विज्ञानाच्या आधारे सिद्ध झाले आहेत. भस्म हे वैराग्याचे प्रतिक आहे. दररोज शिवपुजन केल्यावर वा स्नान केल्यावर भस्म जरूर लावावे. जर कार्यालयात जाताना कपाळाला लावलेले भस्म तेथील 'कॉर्पोरेट' वातावरणात बरोबर नाही असे वाटत असेल तर हृदयस्थानी ते लावावे. शेवटी शिव भक्ताच्या हृदयातच तर रहातो! भस्म लावताना 'रज-तम-सत्व' या त्रिगुणांची योगसाधनेने केलेली राख हा सांकेतीक अर्थ ध्यानात घ्यावा.
  • शिवमहिम्न स्तोत्राचे वा अन्य शिवस्तोत्रांचे रोज पठण करावे. मराठीतील 'शिवस्तुती' स्तोत्र प्रसिद्धच आहे. शिवगुणांचे किर्तन, भजन अवश्य करावे. शिवपुराण, शिवकथा यांचे वाचन करावे.
  • सोमवार, प्रदोष, शिवरात्र या दिवशी विशेष रूपाने साधना करावी. शक्य असेल तर उपवास करावा वा फालाहारावर रहावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा शिवमंदिरात अवश्य जावे.
  • व्यसने, मांसाहार, कांदा, लसूण आणि तामसिक पदार्थ यांपासून दूर रहावे. या सर्व गोष्टींचा ध्यानावर वाईट परिणाम होतो.
  • दररोज झोपताना दिवसभरातील सर्व कर्मे (चांगली आणि वाईट) मनोमन शिवचरणी अर्पण करावीत आणि मग शयन करावे.
  • शिवभक्ताने अन्य दैवतांची निंदा करू नये पण त्याचबरोबर शिवनिंदा जेथे होत आहे तेथे क्षणभरही थांबू नये. शिवनिंदकाची संगत कधीही करू नये.
  • जप आणि अजप ह्या शैव आणि नाथ पंथातील मुख्य साधना आहेत. त्या अवश्य कराव्यात. या साधनांनी कुंडलिनी सुखकारकपणे जागृत होते. या साधना शक्यतोवर एकाद्या गुरूकडून घ्याव्यात. मंत्र गुरूमुखातून का घ्यावा हे आपण आधी पाहिले आहेच.
  • शंकरासारखे श्रेष्ठ दैवत नाही, सुषुम्नेसारखा श्रेष्ठ मार्ग नाही, त्रिकुटीसारखे श्रेष्ठ तीर्थ नाही, अजपासारखा श्रेष्ठ जप नाही आणि शांभवी सारखी श्रेष्ठ मुद्रा नाही हे पक्के लक्षात ठेवावे.
  • योगमार्ग प्रत्यक्ष फल देणारा मार्ग आहे. पुस्तकी बडबडीचे येथे काम नाही. व्यर्थ चर्चा, वादविवाद इत्यादींमधे वेळ वाया न घालवता साधनारत असावे. आपणाला फार ज्ञान आहे असा गर्व कधीही करू नये. योगमार्ग हा समुद्र आहे त्यातील एक थेंब एका मानवी आयुष्यात मिळाला तरी जीवन धन्य आहे तेव्हा काही वर्षे साधना केली वा काही अनुभव आले म्हणजे आपले हात आकाशाला लागले अशा भ्रमात राहू नये.
  • योगमार्गातील यमनियम पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करावा.
  • शंकराचे मानवी रूप म्हणजे गुरू. गुरूतत्वाविषयी आपण आधी जाणून घेतले आहेच. जर तुम्ही कोणाला गुरू केले असेल तर गुरूभक्तीत चुकारपणा कधीही करू नये. पाखंडी गुरूंची सावलीही अंगावर पडू देऊ नये. जोवर गुरू मिळत नाही तोवर शास्त्रग्रंथांच्या आधारे नामस्मरणादी साधना कराव्यात.
वरील नियम पाळून साधनारत राहिल्यास एक ना एक दिवस सदाशिव प्रसन्न झाल्याशिवाय रहाणार नाही. जेवढी भक्ती अधिक तेवढी प्रगती अधिक.
पराकोटीची भक्ती कशी असते? याच विषयी नाथसाहित्यात प्रचलित असलेली एक सुरस कथा सांगतो.

.,.,.,.,.एकदा गोरक्षनाथ आणि शंकराचा मानसपुत्र वीरभद्र यांच्यात युद्ध सुरू झाले. वीरभद्र देव, यक्षिणी, गण यांच्यासह युद्धात उतरला. गोरक्षनाथांनी एकटे. त्यांनी आपल्या बाजूने लढण्यासाठी पूर्वी मृत झालेल्या रावण, कुंभकर्ण, मेघनाद इत्यादी सर्व राक्षसांना जिवंत केले. घनघोर युद्ध सुरू झाले. राक्षस जागे झालेले पाहून विष्णू घाबरला. तो गोरक्षनाथांना म्हणाला "या एकेका राक्षसाला मारण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागले. आता तु त्यांना परत उठवलेस. हे तु सर्वथा अनुचित केलेस. त्यांना परत नाहिसे कर." गोरक्षनाथ विष्णू आणि शंकराला म्हणाले "मी या सर्व वीरांना भस्मसात तर करीन पण त्यांच्याबरोबर वीरभद्र आणि अन्य देवसैन्यही मारले जाईल." दुसरा काही उपाय दिसेना तेव्हा नाईलाजाने शंकराने होकार दिला. गोरक्षनाथाने मग सर्व सैन्य जाळून भस्मसात केले. आपला मानसपुत्र वीरभद्र गेल्याचे शंकराला दुःख वाटले. तो मुक रुदन करू लागला. ते पाहून गोरक्षनाथांनी विचार केला "अरेरे! काय केले मी हे. बद्रिकारण्यात मी लहान असताना ज्या शिवशंकराने माझे पालनपोषण केले त्याच दयाळू शंकराला आज मी दुःख दिले." गोरक्षनाथ शंकराला म्हणाले "स्वामी! जर काहितरी उपायाने तुम्ही मला वीरभद्राच्या अस्थि या राखेतून ओळखून दिल्यात तर मी संजीवनी विद्येने त्याला परत जीवंत करीन." शंकर युद्धभुमीतून फिरू लागला. मृत वीरांची हाडे कानाला लावून पाहू लागला. वीरभद्र जेथे धारातीर्थी पडला होता तेथील हाडे कानाला लावताच त्यांतून "शिव शिव" असा शब्द उमटलेला त्याला ऐकू आला. ते ऐकून शंकर गोरक्षनाथांना म्हणाला "माझे सर्व गण शिवमय झालेले आहेत. माझ्या खेरीज अन्य नाम त्यांना ठावूक नाही. ह्या घे वीरभद्राच्या अस्थि." गोरक्षनाथांनी मग वीरभद्राला पुनः जीवंत केले.

भक्ती त्या शिवगणांसारखी असली पाहिले. श्वासाश्वासून, रोमारोमातून शिव हा एकच ध्यास उमटला पाहिजे. जीवंत असतानाच नव्हे तर मेल्यानंतरही शिवनामाची अवीट गोडी दरवळली पाहिजे. शिवनामापुढे चारी मुक़्ती तुच्छ! एकदा का स्वतःला सदाशिवाच्या हवाली केले की मग कर्ता करविता तोच. आपण फक्त त्याचे माध्यम!
खरे सांगायचे तर सदाशिवाबद्दाल जेवढे सांगावे तेवढे थोडेच आहे. जो या जगताला केवळ आपल्या अंशरूपाने व्यापून राहिला आहे त्याचे वर्णन अल्पमति मनुष्यप्राणी किती आणि कसे करणार.
 पुष्पदंत नामक गन्धर्वाने लिहिलेल्या शिवमहिम्नस्तोत्रात सांगितले आहे ते यथार्थच आहे की -

असितगिरीसमं स्यात कज्जलं सिन्धुपात्रे।
सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी॥
लिखती यदि गृहित्वा शारदा सर्वकालं।
तदपि तव गुणानामीश पारं न याति॥

हे इश्वरा! सागराच्या पात्रात पर्वताएवढे काजळ कालवून शाई केली, कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली, लिहिण्यासाठी कागदाचे पान म्हणून पृथ्वी कल्पली आणि स्वतः सरस्वती जरी सर्वकाळ लिहीत बसली तरीही तुझ्या गुणांचा पार लागणार नाही.
॥श्रीत्र्यम्बकेश्वरार्पणमस्तु॥


सदा शिवचरणी लीन,
veershaiv dharm

शैव दर्शन आणि एक गुराखी

शैव दर्शन आणि एक गुराखी

प्राचीन काळापासून हिमालय योग्यांचे वसतीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात कैलास म्हणजे तर साक्षात श्रीशंकराचे निवासस्थान मानले गेले आहे. याच कैलास पर्वताच्या अंगाखांद्यावर खेळलेला एक योगी सुंदरार किंवा सुंदरनाथ. अतिशय उच्च कोटीचा शैव सिद्ध. एकदा त्याला आपला मित्र अगस्त्यार (अगस्ती ऋषी) याला भेटण्याची इच्छा झाली. अगस्त्यारचे वास्तव्य दक्षिणेकडे होते तेव्हा सुंदरनाथ कैलासावरून दक्षिणेला जायला निघाला. मजल दरमजल करत तो थिरूकडईक्कप्पू (Tirukadaikkappu) या तामिळनाडूमधील गावी पोहोचला.
गावाच्या वेशीवर त्याला एक गाईंचा कळप हंबरत सैरभैर अवस्थेत भटकलेला दिसला. नीट पाहिल्यावर त्याला असे आढळले की त्यांचा गुराखी मृतावस्थेत पडला आहे. सुंदरनाथला फार वाईट वाटले. त्या सैरभैर झालेल्या गाईंची त्याला दया आली. त्यांना त्याच अवस्थेत सोडून पुढे जाणे त्याला योग्य वाटले नाही. सुंदरनाथ स्वतः एक सिद्ध होता. अष्टमहासिद्धी त्याचा चरणांशी लोळत असत. त्याने आपल्या योगासामर्थ्याने आपल्या देहाचा त्याग केला आणि त्या मेलेल्या गुराख्याच्या शरीरात प्रवेश केला. भटकलेल्या गाईंना त्यांच्या गोठ्यापर्यंत सोडावे आणि परत आपल्या जुन्या देहात प्रवेश करावे असे त्याने ठरवले. आपला जुना देह आडोशाला दडवून ठेवून तो गाईंना गावात पोहोचवण्यासाठी निघाला.
गुराख्याच्या शरीरातील सुंदरनाथने गाईंची व्यवस्था नीट लावली आणि तो परत मूळ ठिकाणी आला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याला आपला जुना देह कोठेच दिसेना. आदिनाथ शंकरानेच शैव दर्शनाचा पुनर्प्रसार दक्षिणेकडे व्हावा हा हेतू मनात धरून तो नाहीसा केला होता. आपला जुना देह नाहीसा झाल्याने सुंदरनाला गुराख्याच्या देहातच रहाणे भाग पडले. जवळच असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली तो समाधीस्त बसू लागला. हळूहळू गावात ही गोष्ट समजली. लोक त्याला पाहायला गर्दी करू लागले. त्याचे नाव माहीत नसल्याने गावाच्या नावावरून त्याला थिरुमुलार म्हटले जावू लागले. सुंदरनाथचा थिरुमुलार झाला. जवळजवळ सर्व काळ तो समाधीतच असे. जेव्हा कधी भानावर येई त्तेव्हा त्याच्या तोंडून एखादा श्लोक बाहेर पडे आणि मग तो परत समाधीत जाई. त्याच्या जवळपासचे लोक त्याचे बोल उपदेश म्हणून जतन करत असत. करता करता अशा ३००० तामिळ श्लोकांचा समूह तयार झाला. तो उपदेश समूह आजही दक्षिणेकडे विशेषतः तामिळनाडूमध्ये 'थिरुमंदिरम' म्हणून प्रसिद्ध आहे.
थिरुमंदिरम हा शैवदर्शन आणि कुंडलिनी योग या विषयावरील एक अतिशय अधिकारी आणि प्रामाणिक असा ग्रंथ आहे. नऊ प्रकरणांमध्ये त्याची विभागणी केलेली आढळते.
 थिरुमंदिरमची काही वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे: 
  • संस्कृतेतर भाषेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथांतील एक अतिशय उच्च कोटीचा ग्रंथ.
  • आज मुळ शैव आगम ग्रंथ मिळणे दुरापास्त झाले आहे. थिरुमंदिरम समस्त शैव आगमांचे सार आहे. स्वतः थिरुमुलारनेच त्याला 'आगम' असे म्हटले आहे. 
  • शिवभक्ती, यंत्र, मंत्र, कुंडलिनी योग, चर्या, ज्ञान इत्यादी अनेक विषयांवर तो प्रकाश टाकतो.
  • थिरुमंदिरम सर्व विचारधारांना एकत्र आणणारा ग्रंथ आहे. वेद आणि आगम हे दोन्ही शंकरानेच दिले आहेत. त्यात अंतिम उद्दिष्टाच्या दृष्टीने काहीच फरक नाही. 'वेदान्त' आणि 'सिद्धान्त' एकच आहेत असे थिरुमुलार सांगतो.
  • ईश्वर म्हणजे प्रेम (God is Love) ही थिरुमंदिरम मधील प्रसिद्ध उक्ती आहे.
  • थिरुमंदिरममध्ये आपल्याला 'भेसळमुक्त' शैव दर्शन आणि कुंडलिनी योग पाहायला मिळतो.
वरील गोष्टीचा सांकेतिक अर्थही आहे. गाईंचा सैरभैर झालेला कळप अर्थात खर्‍या आत्मज्ञानापसून भरकटलेल्या साधकांचे प्रतीक आहे. गुराखी जसा गुरांना योग्य प्रकारे वाट दाखवतो आणि सुखरूपपणे गोठ्यात आणतो त्याचप्रमाणे शैवदर्शन आणि कुंडलिनी योग मुक्तीची अभिलाषा बाळगणार्‍याना मार्ग दाखवते. आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रीशंकराच्या चरणी विनम्र प्रार्थना की त्या गाईंना जसा गुराखी मिळाला तसाच आजच्या साधकांनाही योग्य 'गुराखी' मिळू दे. अध्यात्मामार्गावर अहंकार, दिखाऊपणा, खोटी स्वप्रतिष्ठा, आपापल्या मार्गाबद्दलचा दुराग्रह आणि दुराभिमान इत्यादी दोषांमुळे भरकटलेल्या साधकांना योग्य मार्ग मिळू दे. त्यांना आपापल्या 'गोठ्यात' सुखरूप परतू दे.

सदा शिवचरणी लीन,
veershaiv dharm

शिवगुरू आणि ऋषभयोग्याचा अमुल्य उपदेश

शिवगुरू आणि ऋषभयोग्याचा अमुल्य उपदेश

भगवान विष्णू दुष्टांच्या निर्मुलनासाठी वारंवार अवतार घेतो हे तर सर्वश्रुतच आहे.श्रीशंकर मात्र वेगळ्या स्वरूपात आपले कार्य अखंडपणे चालू ठेवतो. 
श्रीशंकराचे हे रूप म्हणजे गुरू.
अनादी कालापासून शंकराला सर्वांनीच गुरू रूपात स्विकारलेले आहे. विशेषतः योगशास्त्रात शंकराला आदिगुरू म्हणून अत्यंत भक्तिभावाने पुजले जाते. महाराष्ट्रात वेदतुल्य मानल्या गेलेल्या गुरूचरित्रातही शंकराचा उल्लेख 'पूर्वपीठ शंकरू' असाच आहे. शंकराकडून विष्णुला आणि विष्णुकडून ब्रह्माला असे ज्ञानाचे संक्रमण झाले असे त्यात सांगितले आहे. नाथसंप्रदायाचे लोकप्रिय ग्रंथ नवनाथ भक्तिसार आणि नाथलिलामृही शंकराकडून ही योगविद्या पंथाला कशी प्राप्त झाली त्याचे वर्णन करतात. योगशास्त्राची अशी मान्यता आहे की योगशास्त्र हे सर्वप्रथम श्रीशंकराने पार्वतीला सांगितले. म्हणजेच पार्वती शंकराची प्रथम शिष्या. तेथून मग गुरू-शिष्य परंपरेने ते आज आपल्यापर्यंत उपलब्ध झाले. कित्येक आगम ग्रंथ शिव-पार्वती संवाद अशा स्वरूपात आहेत. पार्वती शंकराला प्रश्न करते आणि शंकर त्या प्रश्नांना उत्तर देतो असे त्या ग्रंथांचे स्वरूप आहे. शिवपुराणात शिवशंकराने अठ्ठावीस योगाचार्यांच्या रूपात अवतार घेतला असा उल्लेख आहे. या अठ्ठावीस आचार्यांनी आणि त्यांच्या एकशे बारा शिष्यांनी सर्वत्र योगमार्गाचा प्रसार आणि प्रचार केला असे मानले जाते. हे सर्व योगी सिद्ध होते. ते सर्व शास्त्रांत पारंगत, वेदज्ञानी, वैराग्यपूर्ण, शिवज्ञानपरायण, जितेंद्रिय आणि केवळ शिवशंकरामधे मन जडलेले असे होते. रुद्राक्ष आणि भस्म हीच काय ती त्यांची आभूषणे.
श्रीशंकराने पार्वतीला प्रथमतः योगदीक्षा दिली त्या विषयी एक सुरस कथा आहे. नाथसंप्रदायाशी या कथेचा अगदी जवळचा संबंध आहे. ती मी अन्यत्रही दिली आहे पण येथे पुनरावृत्ती अस्थानी ठरणार नाही.
एकदा शंकर आणि पार्वती केलासावर क्रिडा करत होते. पार्वतीने शंकराला विचारले, "तुम्ही कायम समाधिस्त असता. तुम्हीच या विश्वाचे जन्मदाते, पालक आणि संहारक आहात यात संशय नाही. मग तुम्ही ध्यान तरी कोणाचे करत असता?" त्यावर शंकर उत्तरला, "आत्म्याचे. देवि हे जग आत्मतत्वाचाच विस्तार आहे. मी सदा सर्वदा त्याचेच ध्यान करत असतो." आपण मागील लेखात पाहिलेच की या आत्मतत्वालाच वेदांती ब्रह्म म्हणतात तर शैव परमशिव. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की पार्वतीपति शंकर हा निर्ग़ुण परमशिवाचे सगुण रूप आहे. त्याचे हे सगुण रूप त्याने परमशिव तत्वाच्या आधारानेच साकारलेले आहे. तेव्हा सोप्या भाषेत सांगायचे तर शंकर स्वतःचेच ध्यान करतो!
पुढे पार्वतीने शंकराला विचारले, "मलाही हे रहस्य काय आहे त्याचे ज्ञान द्याल का?" त्यावर शंकर म्हणाला, "जरूर. पण देवी हे ज्ञान अती गूढ आहे तेव्हा एकांतातच मी तुला ते प्रदान करीन." यावर ते दोघे एकांत कोठे मिळेल ते पाहु लागले. नंदी, रुद्रगण या सर्वांना चुकवून त्यांनी एका नदीचा काठ पसंत केला. काठावर बसून शंकर पार्वतीला कुंडलिनी योगशास्त्राचे गूढ ज्ञान प्रदान करू लागला. ज्ञान दानाचे कार्य संपल्यावर पार्वतीला किती समजले ते पहावे असा विचार शंकराच्या मनात आला. त्याने विचारले, "देवी! तुला सर्व नीट कळले ना. सांग बरे सर्वत्र काय भरलेले आहे?" या प्रश्नावर पार्वती उत्तर देणार एवढ्यात पाण्यातून उत्तर आले. शंकराने चाकाटून पाण्यात पाहिले तो एका माशाच्या पोटातील गर्भाने ते उत्तर दिले होते. शंकराने दयाळूपणे त्या मत्स्यबाळाला मानव रूप प्रदान केले. तोच नाथ संप्रदायाचा जनक मच्छिंद्रनाथ! शंकराच्या आज्ञेने मग मच्छिंद्रनाथाने कुंडलिनी योगशास्त्राचा आणि शाबरी मंत्रविद्येचा सर्वत्र प्रसार केला.
आदिगुरू शंकरापासून उगम पावलेले गुरूतत्व प्रत्येक गुरूत वास करत असते. गुरू हे एक तत्व आहे हाडामासाचा देह नव्हे. गुरू विषयी दोन टोकाच्या भुमिका घेणारे विचारप्रवाह आज आढळतात. काही म्हणतात आम्हाला गुरूची गरजच नाही तर काही म्हणतात गुरू म्हणजे कोण एक मनुष्य देह. या दोघांनाही खरे गुरूतत्व कळलेच नाही असे म्हणावे लागेल. अध्यात्ममार्गावर गुरूचे महत्व वादातीत आहे. गुरू या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानरूपी अंधार दुर करणारा. हे कार्य ज्यामुळे साधेल तो गुरू. जीव आणि शिव भिन्न आहेत असे समजणे म्हणजे अज्ञान. याउलट जीव आणि शिव यांचे एकत्व मनात ठसणे आणि हे एकत्व प्रत्यक्ष अनुभवणे म्हणजे ज्ञान. गुरूशिवाय अध्यात्ममार्गाची वाटचाल करणे हे अशक्य नसले तरी फार खडतर नक्किच आहे.
प्राचीन शैव आगम ग्रंथांमध्ये गुरू तीन प्रकारचा सांगितला गेला आहे - पुरुष गुरू, सिद्ध गुरू आणि दैवी गुरू. पुरुष गुरू हा हाडामासाच्या देहाद्वारे शिष्याला ज्ञान प्रदान करतो. साधारणतः सर्वांना अशाच प्रकारचा गुरू सहज लाभतो. पुरुष गुरूचेही हा सत्गुरू आणि गुरू असे उपविभाग पडतात. सत्गुरू म्हणजे अशी व्यक्ती की जीला पूर्णत्वाने परमेश्वरी चैतन्याची अनुभुती आलेली आहे. गुरू म्हणजे अशी व्यक्ती की जी योगमार्गावर अत्यंत प्रगत तर आहे, तीला परमेश्वरी चैतन्याची क्वचित प्रसंगी अनुभूतीही आलेली आहे पण अजुनही सत्गुरू प्रमाणे तीला पूर्णत्वाने परमेश्वरी चैतन्याची प्राप्ती झालेली नाही. येथे साधकाच्या दृष्टीने लक्षात ठेवायची एक महत्वाची गोष्ट म्हणजे सत्गुरू आणि गुरू यांमधे श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव कधीही करू नये कारण साधकापेक्षा या दोनही प्रकारच्या व्यक्ती अत्यंत प्रगत असतात. त्यांत भेदाभेद करणे हा साधकाच्या दृष्टीने अनधिकारच ठरतो. त्यामुळेच आध्यात्मिक क्षेत्रात सत्गुरू आणि गुरू या दोघांनाही 'गुरू' याच शब्दाने संबोधले जाते.
योगमार्गाची पराकोटीची सिद्धता ज्यांना लाभली आहे ते सिद्ध म्हणून ओळखले जातात. सिद्ध मृत्युला जिंकून स्वेच्छेने ब्रह्मांडात विचरण करतात. नाथ संप्रयदायात असे अनेक सिद्ध प्रसिद्ध आहेत. नवनाथ तर आजही सुक्ष्मरूपाने आपल्या साधक भक्तांना मदत करत असतात. ही मदत कधी प्रत्यक्ष असते तर कधी अप्रत्यक्ष. अन्य पंथांमधेही 'सिद्ध' ही संकल्पना आहेच आणि ते आपापल्या भक्तांना मदत करतात असा दृढ विश्वासही. जेव्हा अशा एखाद्या सिद्धाकडून साधकाला अनुग्रह मिळतो तेव्हा तो साधकाचा सिद्ध गुरू ठरतो.
दैवी गुरू म्हणजे साधकाचे आराध्य दैवत वा त्याचा अवतार. साधकाची भक्ती जर अत्यंत तीव्र असेल. साधना बळकट असेल तर प्रत्यक्ष आपल्या आराध्य दैवताकडून साधकाला काही वेळा अनुग्रह मिळतो. हा अनुग्रह साधारणतः स्वप्नात, ध्यान करत असताना, भक्तीचा आवेग तीव्र असताना प्राप्त होतो. काही वेळा अशी माणसे आढळतात जी म्हणतात की आम्हाला स्वप्नात आमचे कुलदैवत दिसले वा आमच्या इष्टदैवताने स्वप्नात काही सांगितले, प्रश्नाचे उत्तर दिले, अडचणीतून मार्ग दाखवला वगैरे. अशा प्रकारचे अनुभव हे 'अनुग्रह' या सदरात बसत नाहीत हे लक्षात ठेवावे कारण अशा अनुभवांनंतरही साधकात आध्यात्मिकदृष्ट्या कोणताही बदल झालेला नसतो. अनुग्रह ही अशी गोष्ट आहे की जी साधकाची आध्यत्मिक प्रगती अगदी खात्रीने करतेच. त्याबद्दल साधकाला संशय रहात नाही.
साधकाला कोणत्या प्रकारच्या गुरूकडून अनुग्रह मिळावा हे त्याच्या पूर्वकर्मावर, साधनेच्या तीव्रतेवर आणि भक्तीवर अवलंबून असते. असो. आता परत मुळ विषयाकडे वळूया.
एकदा शंकराने ऋषभ नावाच्या शिवयोग्याचा रुपाने अवतार घेतला होता. स्कन्द पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात त्याविषयी सुरस कथा आहे. श्रीधरकवीने आपल्या ओवीबद्ध भाषेत ती छान सांगितली आले. येथे संपूर्ण कथा सांगण्याचे कारण नाही परंतू त्या कथेतील शिवयोग्याचा उपदेश अत्यंत महत्वाचा आणि उद्बोधक आहे. कथेची पार्श्वभुमी अशी आहे...
एका राजाची सुमती नावाची राणी गर्भवती असते. अन्य सावत्र राण्या तीला मुलगा झाला तर राजा आपल्याकडे दुर्लक्ष करेल या भितीने तिच्यावर विषप्रयोग करतात. सुमती राणी सदैवाने मृत्युमुखी पडत नाही पण विषामुळे तीच्या सर्वांगावर विषार फुटतो. दिवसरात्र त्यामधुन रक्त आणि घाण वाहू लागते. राजा काही काळ वैद्याकरवी औषधोपचार करवतो पण नंतर तीचा वीट येऊन तीला जंगलात नेऊन सोडतो. बिचारी राणी रानावनात ठोकरा खात फिरत असते. तशाच अवस्थेत ती प्रसुत होते आणि तीला मुलगा होतो. दर्दैवाने त्या मुलालाही विषार लागतो. आपल्या नशिबाला दोष देत ती जंगलात कसेबसे दिवस कंठत असते. एक वृद्ध व्यापारी तीला पाहतो आणि तीची दया येऊन तीला आपल्या तांड्याबरोबर ठेवतो. बरेच उपचार करूनही आईचा आणि बाळाचा विषार काही जात नाही. एक दिवस बाळ प्राण सोडतं. सुमतीचा धीर सुटतो. त्याच वेळी ऋषभ नावाचा एक शिवयोगी अवतरतो. सुमती रडत रडत त्याला आपली सर्व कहाणी सांगते. त्यावर शिवयोगी सुमतीला म्हणतो, "बाळे! कोरडा शोक कशाला करतेस? तुझे पूर्जन्मीचे आईबाप, भाऊबहिणी, मुलगे आज कोठे आहेत? चौर्‍याएंशी योनी फिरत आलिस तेथील सगेसोयरे आज कोठे आहेत? अजूनही किती जन्म आहेत याचा कधी विचार केला आहेस का? ज्या ज्या जातीचे शरीर घारण करतात त्या त्या जातीच्या अभिमानाने लोक नाचत असतात पण मुळात आपण कोठून आलो याचा शोध काही घेत नाहीत. तू हा पुत्र कोठून आणलास आणि मृत्युनंतर तो कोठे गेला? तू आणि हे सगळे लोक मेल्यावर कोठे जाणार आहेत? आत्मा हाच शाश्वत आहे, नित्य शिव आहे. शरीर क्षणभंगूर आहे. तो आत्मा कोणाचाही बन्धू वा पुत्र नाही. ज्या शरीरासाठी तू शोक करतेस ते प्रेत तुझ्यापुढे पडले आहे! मृगजळच मुळात मित्थ्या असते. त्यावरचे बुडबुडे किती मित्थ्या असतील! चित्रातील वृक्षाच्या सावलीत कोण बसेल? चित्रातील अग्नीने कोण जळेल? आणि चित्रातील गंगानदीत मासे पोहतात असे दृश्य रंगविले तरी त्या प्रवाहात कोणी वाहून जातो का? व्यन्धेच्या मुलाने पुष्कळ द्रव्य कमवले असे झाले आहे का? भीष्माची कन्या हनुमंताला दिली असे कधी झाले आहे का? आणि गन्धर्व हे वर्‍हाडी? लग्न कोणी लावले? वार्‍याचा मंडप वाळूच्या दोराने शिवला? शिंपीतील रुप्याच्या पात्रात आकाशपुष्प कोणी भरले? कासवीच्या दुधाचे तुप करोन मृगजळातील मासे कधी दीप प्रज्वलित करतील का? आणि ते मासे पायात चाळ बांधून नाचू लागले ते जन्मांध पाहात बसतील का? सापाच्या कानातील कुंडले चित्रांतल्या चोरांनी चोरून आणली हे जसे लटके तसाच हा प्रपंच मुलातच खोटा आहे. त्याला खरा कसा मानावा? हे सर्व मुलातच अशाश्वत आहे त्याचा शोक करणे व्यर्थ नाही का? हे शरीर म्हणजे कोशरूपी वृक्षांचे अद्यानच आहे. सर्व रोगांचे भांडार! कृमिकीटकांचे माहेर! पापाचा समुद्रच! भ्रांतीचे आकाश! रक्त, अस्थी, श्लेष्मा, नसा यांची ही चामड्याने वेष्टिलेली मोळी आहे! हे मुळातच अपवित्र आहे ते गोमुत्र शिंपडून पवित्र होईल का? डोक्याचे मुंडन केले तर पवित्र झाले का? वत्से! गुरूला शरण जात नाहीत तर प्राणी कसे उद्धरून जातील? कल्पकोटी फेरे मारतील तरी मुक्त होणार नाहीत. सत्वर सावध हो कशी. तीन गुणांच्या दोरखंडाने पंचमहाभुतांचे वासे बांधून हे जग निर्माण केले आहे. गंगेत दोन काष्ठे एकत्र येतात आणि दूर जातात तसे पतिपत्नी एकत्र येतात. नुसता खेळ आहे हा! सत्य नव्हे. अपत्ये ही उडत उडत एका वृक्षावर येऊन बसणारी व नंतर दुसर्‍या वृक्षावर जाणारी पाखरे आहेत. ऊन लागले म्हणजे पांथस्थ वृक्षाच्या छायेला बसतात, ऊन कलले म्हणजे निघून जातात तसे सोयरे असतात. मायामय अशा प्रपंचाच्या वृक्षावर जीव व शिव हे दोन पक्षी आहेत. शिव हा सर्वसाक्षी असतो. सावधान असतो, कशातही गुंतत नाही. जीव मात्र विषयरूपी फळे भक्षण करतो. त्यामुळे स्वतःचा विसर पडून जन्ममरण भोगत फिरत राहतो. त्यांमधे एखादा पुण्यवंत गुरूला शरण जातो! तो स्वतः शिव होतो व शिवाची भक्ती करतो!"
हे वैराग्यपूर्ण निरूपण एकल्यावर सुमती ऋषभयोग्याच्या चरणांवर लोटली. आपल्या मृत बाळालाही तीने शिवयोग्याच्या चरणांवर घातले. शंकराला आपल्या भक्तांचे दुःख जराही सहन होत नाही. तो लगेच भक्तांच्या मदतीस धावतो. ऋषभयोग्याने सुमतीचे मृत बाळ जीवंत केले! दोघांनाही मृत्युंजय मंत्र सांगितला ज्या योगे दोघेही विषार जाऊन निरोगी झाले! ऋषभयोग्याने त्या बाळाचे नाव भद्रायु असे ठेवले.
पुढे भद्रायु थोडा मोठा झाल्यावर ऋषभयोगी परत एकदा अवतीर्ण झाला आणि त्याने भद्रायुला उपदेश दिला. आजच्या काळातही तो उपदेश सर्वांसाठीच (अगदी अध्यात्ममार्गावर नसलेल्यांसाठीही) अमुल्य असा आहे. ऋषभयोगी भद्रायुला म्हणाला, "भद्रायु, श्रुती, स्मृती व पुराणे यांत सांगितलेल्या नियमांचे पालन कर. माता, पिता व गुरू यांच्या ठायी निष्ठा ठेव. त्यांची निंदा प्राणांतीही करू नये. सर्वांभूती शिव हाच आत्मरूपी असतो हे विसरू नको. स्वधर्म कधी टाकू नको. कोणतेही काम विचार न करता, उतावळेपणाने करू नये. आपल्या जवळपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोलावे. काळ कोणता आहे, मित्र कोण, शत्रू कोण, द्वेश करणारा कोण याचा विचार करावा. धानार्जन किती, खर्च किती, आपली दुर्बलता कोणती, आपले सेवक कसे काम करतात, आपल्याला यश देतात की अपयश हे पहावे. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, अग्नी, पशु, शेती व धन यांच्याकडे वारंवार लक्ष देत जावे. आपली लहान अपत्ये, पत्नी, शत्रू, दास, घर, रोग यांची उपेक्षा करू नये. दुर्लक्ष केले तर फार हानी होते. विद्वान व ज्ञानी जसे आचरण करतात तसे करावे. परोपकार करावा, परपीडा करू नये. परनिंदा टाकून सदा शिवस्मरणात रहावे. शंकराची सेवा व स्मरण हेच मोठे तप होय. परस्त्री व परधन यांची अभिलाषा धरू नये. शास्त्रे श्रेद्धेने श्रवण करावी. श्रवण, मनन, निजध्यास सतत करावा.
धर्मपत्नीविषयी प्रेम, परस्त्रीविषयी आदर व विरक्ती, शत्रूंवर क्रोध, साधुंशी नम्रता, द्वेष्ट्या जनांविषयी मद, संतभक्तांविषयी नम्रता व साम्यभाव, समाजकंटकांविषयी मत्सर, सर्वसामान्यांविषयी निर्मत्सर, दुर्जनांसी दंभ, भल्या माणसाला वंदन, पृथ्वी जिंकण्यासाठी अभिमान, द्विजांशी निरभिमान, दानाने हातचे सार्थक, तीर्थयात्रा करण्यात पदयात्रा, शंकराचे ध्यान, पुराणांचे श्रवण करावे. संतांच्या स्पर्शाने त्वचेचे सार्थ मानावे व नेत्र शंकराचे दर्शन करण्यात धन्य मानावे. जिभेचा उपयोग स्तोत्र म्हणण्यासाठी करावा. नाकाचा उपयोग शिवनिर्माल्याचा वास घेण्यासाठी करावा. कृपा करावी ती दीन व अनाथ यांवर. इश्वरावर प्रेम करावे, संतांशी मैत्री करावी, देवांचा द्वेश करणार्‍यांची उपेक्षा करावी.
योग्य काळी निद्रा घ्यावी, योग्य आहार घ्यावा. आपले वित्त गुप्त ठेवावे. आयुर्मान, गृहच्छिद्र, औषध, पुण्य, मंत्र हे गुप्त ठेवावे. आपण केलेले दान, स्त्रीभोग, मान, अपमान आपल्याजवळच ठेवावा. अति सर्वत्र वर्ज्य करावे. मैत्री असो, शिक्षण असो, स्मृती असो, पुण्य असो हे प्रमाणातच असावे. पण उत्साह, धैर्य, दान ही वाढती असावीत.
गावच्या सभेत शठ, पापी, धूर्त, चोर, व्यभिचारी, कपटी, चंचल, पोरकट, खोटे बोलणारे असे लोक नसावेत. निंदक, भक्तीमार्गाचा उच्छिद करणारे, मद्यपी, अगम्य स्त्रीशी गमन करणारे, कृतघ्न, वाटमारे, धर्मनष्ट यांचे दर्शनही करू नये. पूर्वी जो शत्रू होता व आता आपला मित्र झाला आहे अशा माणसावर विश्वास टाकू नये.
पत्नी, पुत्र व धन यांविषयी कर्तव्यबुद्धीने वागावे. आसक्ती नसावी. इतर नातलगांशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. भलत्या गोष्टी पाहून त्यांची हाव धरू नये. मोठ्या डोहात उडी मारणे, महापुरुषाशी युद्ध करणे, बलवंताशी झगडा करणे ही अनर्थाची द्वारे अहेत. हाताचे भुषण कंकण व मुद्रिका नसून दान हेच आहे. कुंडले ही कर्णांचे भूषण नसून उत्तम ग्रंथांचे श्रवण हेच भूषण आहे. ज्याची वाणी गोड, ज्याची भार्या रूपवती, जो संपत्तिमान व उदार असतो त्याचे जिवीत सफल होय.
वाणीचे व्रत म्हणजे वेद आणि खरे बोलणे. विद्येने योग्य असे जे कोणी असतील त्यांना लगेच काहितरी सन्मानाने द्यावे. विपत्तीत धैर्य धरावे, वादात वाणीने विजय मिळवावा, युद्धात पराक्रम करावा, याचकाला देण्यात हात मागे घेऊ नये. सत्समागमापुढे प्रत्यक्ष अमृतही तुच्छ आहे. दुसर्‍याच्या पराक्रमावर चरफडू नये. आपणही पराक्रम करावा. दुसर्‍याला सुख मिळाले तर त्यात आपणही आनंदित व्हावे.
पृथ्वीवर चार मोठी रत्ने आहेत - अन्न, पाणी, सत्य व मृदु वचन आणि औदार्य. बाकी मुल्यवान खडे-पाषाण ही रत्ने व्यर्थ आहेत. कोणाचेही वर्म बोलून दाखवू नये. भाग्य वाढले तरी आपला धर्म सोडू नये. गुरू व शंकर यांत भेदबाव करू नये. भाग्याचा व विद्येचा गर्व सोडून द्यावा. कुल, शील, विद्या, राज्य, तप, रूप व तारुण्य यांचा गर्व फार लवकर वाटू लागतो. असा गर्व कधीच करू नये."
असा उपदेश देऊन श्रीशंकराने भद्रायुला सामर्थ्य प्रदान केले ज्याच्या जोरावर त्याने आपले गतवैभव परत मिळवले.
शंकर गुरूरूपात वास करतो हे खरे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आज पाखंडी गुरूंमुळे 'गुरू' हा शब्द अपशब्द बनतो की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. एकवेळ गुरू न मिळाला तरी चालेल पण पाखंडी गुरू मिळू नये. पाखंडी गुरू स्वतः तर नरकात जातोच पण आपल्याबरोबर साधकालाही नरकात लोटतो. निव्वळ भगव्या वस्त्रांवरून, मुंडन वा जटा संभारावरून, आश्रम व शिष्यसमुदायावरून गुरू खरा की खोटा हे कळत नसते. ही केवळ बाह्य चिन्हे आहेत जी अनेकवेळा फसवी ठरू शकतात. तेव्हा साधकाने याबाबत डोळसपणे वागावे. जोवर गुरूंची भेट होत नाही तोवर सत्पुरुषांनी लिहिलेल्या ग्रंथांचे वाचन करावे, त्यातील शिकवण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. नामस्मरण करावे. अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. अंतरी खरी तळमळ असेल तर योग्य वेळ येताच कोणत्या ना कोणत्या रूपात गुरू अवश्य भेटतोच.

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.

सदा शिवचरणी लीन,
veershaivdharm 

लंकेची पार्वती

सोने की लंका जलाय गयो रे, एक छोटोसो वानर....
रावण को पानी पिलाय गयो रे, एक छोटो सो वानर...
ढुडुम ढुम टू ढुम ढुम...

मंदिरात ढोलकी.. टाळ.. टाळ्यांच्या गजरात गाणं खूपच रंगलं होतं. ते कानात इतकं बसलं होतं.. आणि त्या सोबतच सोनेकी लंका सोनेकी लंका हे शब्दही एकसारखे मनात येत होते आणि प्रश्णही तेवढेच पडत होते.

रामायणातले लंकादहन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हनुमानाने सोन्याची लंका जाळली.
लंका सोन्याची खरंच होती का ? होती तर सोन्याची का होती आणि कुणी बनवली होती ?
सीतेला लंकेची पार्वती का म्हणतात ?
लंकेत सोन्याच्या विटा हा वाकप्रचार का रुढ झाला असेल ?

जाउदे ना ही सारी पुराणातली वांगी - वानगी. पण पुराणात ह्या सार्‍याचा उल्लेख आहे म्हणजेच त्यामागे काही ना काही गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक संदर्भासाठी काही कथा दंत कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच ही सोन्याच्या लंकेची आणी पार्वतीची कहाणी.

कैलासावर रहाणार्‍या अजर अमर शिवपार्वतीची एक कहाणी आहे. बसल्या बसल्या एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायचे. शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेउन देवी पार्वती लक्ष्मी कडे गेली. खरं तर प्रभू इच्छेविरूद्ध काहिही घडणे कठीणच. पण मन वेडं असतं तेच संकल्प विकल्प घडवून आणतं जेव्हा जिथे हवं तिथे आपल्याला घेउन जातं, त्याच प्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं.ती अतीशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली. मनात विचार करीत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल. स्वतःच्या आसनावरून उठून धावत येउन मला मिठी मारेल, जबरदस्ती ने माझा हात धरून मला आसनस्थ करेल, धूप दीप नैवेद्याने मग मला सन्मानीत करेल वगैरे.

पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्ष झालंच नाही. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन वैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली,"ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे ? चिता-भस्म, त्रिशूल-फावडी आणि फाटकं मृगजीन घेउन त्यानं कुठे बस्तान बसवलं आहे ?" पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला, ओठ थरथरले, जीभ फडफडली.. ति म्हणाली, "तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही ? खरं तर तुझ्या पतीला द्युता खेरीज कधी काही कामकाज नाहिये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल. किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भिक मागत फिरत असतो. दधिची रुषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागीतली होती. विसरलिस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत." पार्वती अश्या प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली.

पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, "हे देवी आज चेहरा एवढा उदास का ?" त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मिने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिव शंकराला सांगितले. आणि म्हणाली, "आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही, उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रीत करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेइन की सारी दुनिया बघत राहिल." ह्यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, "मान अपमान, हे सारं आपण मानण्यावर असतं. जाउदे ते कडवट बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर. त्यातच खूप सुख आहे." पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्ह्ती. हट्टाने ती रडू लागली.

मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दु:खी कष्टी आहे. तुम्ही तिचे दु:ख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुष झाली. व विश्वकर्म्याला समजावू लागली. मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे. ज्याला चार दरवाजे असतिल असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड-गरम पाण्याचे ताल तलाव असतिल, सुंदर बाग-बगिचे, स्वच्छ रस्ते असतिल. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मधे मधे हिरे-मोती जडवा. चमचमणार्‍या फरश्यांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत आंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आज पर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल. बघितला नसेल. लक्ष्मी ने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे.

विश्वकर्म्याने सगळे समजावून घेउन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेउन ते आले. एक सर्वोत्कृष्ठ वास्तूकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता, चित्रकला, मूर्तीकला, ह्या सारख्या नानाविध कला वापरून भवन, वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपूण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्या ने ह्या वेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल- दिव्य भवन उभारून दाखवले.

शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्णमहाल पाहून पार्वती अती हर्षीत झाली. म्हणाली माझं स्वप्नं साकार झालं. माझ्या कल्पनेपलिकडे सुंदर असा हा स्वर्णमहाल बनला आहे.पार्वती शंकराला म्हणाली, "हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा. ह्या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देव देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे." तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुष होतो तेवढे त्याचे अश्रू वहातात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या हो ला हो म्हणत गेले. तेहतिस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडीत पुजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी विष्णू, ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले. समुद्राच्या मधे असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरीत झाले.

तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली. आणि म्हणाली, "बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस, हा त्याच भिकार्‍याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आलिये. झरोके खिडक्या दरवाजे इतकंच काय जमिनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपर्‍याइतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहिये." शंकर म्हणाले, "पार्वती असा वृथा अभिमान करू नये". इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम आहूती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पुर्णाहूती पडल्यावर सर्व देव देवतांनी फुलांचा वर्षाव केला, नभांगण शिवपार्वतीच्या जयजयकाराने दुमदुमू लागले. देव-देवता, योगी-ब्राह्मण, साधू-भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षीणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले.

शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत." त्यावर विश्रवा म्हणाले, "भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल ? आत्ता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल ?" भगवान म्हणाले, "मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पुर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईन." ह्यावर शीष झुकवून विश्रवा म्हणाले, "हे भगवन ! तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्णसिन्धू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे. हाच माझ्या मनात भरला आहे." हे ऐकताक्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला,"एक दिवस असा येईल तुझे नामोनिषाण मिटून जाईल कालौघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होउन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल." आपल्याजवळ होतं नव्हतं ते सारं वैभव, दाग दागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली.

ह्या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू असेल.

हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. तीपण पार्वती सारखीच निश्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाउन लंकेचे दहन केले. आणि पुढे झालेल्या युध्दात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला.

वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. कर्ता करविता तोच भोळा सांब.

डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी, जय भोले जय भंडारी !
शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपूरारी, जय भोले जय भंडारी !

वेदसार शिवस्तव:

वेदसार शिवस्तव:

आदिगुरू श्री शंकराचार्य द्वारा रचित यह शिवस्तव वेद वर्णित शिव की स्तुति प्रस्तुत करता है। शिव के रचयिता, पालनकर्ता एव विलयकर्ता विश्वरूप का वर्णन करता यह स्तुति संकलन करने योग्य है।

पशूनां पतिं पापनाशं परेशं
गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम्
जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं
महादेवमेकं स्मरामि स्मरारिम्


(हे शिव आप) जो प्राणिमात्र के स्वामी एवं रक्षक हैं, पाप का नाश करने वाले परमेश्वर हैं, गजराज का चर्म धारण करने वाले हैं, श्रेष्ठ एवं वरण करने योग्य हैं, जिनकी जटाजूट में गंगा जी खेलती हैं, उन एक मात्र महादेव को बारम्बार स्मरण करता हूँ|


महेशं सुरेशं सुरारातिनाशं
विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम्
विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिने
त्रं
सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम्


हे महेश्वर, सुरेश्वर, देवों (के भी) दु:खों का नाश करने वाले विभुं विश्वनाथ (आप) विभुति धारण करने वाले हैं, सूर्य, चन्द्र एवं अग्नि आपके तीन नेत्र के सामान हैं। ऎसे सदा आनन्द प्रदान करने वाले पञ्चमुख वाले महादेव मैं आपकी स्तुति करता हूँ।


गिरीशं गणेशं गले नीलवर्णं
गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपम्
भवं भास्वरं भस्मना भूषिताङ्गं
भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम्


(हे शिव आप) जो कैलाशपति हैं, गणों के स्वामी, नीलकंठ हैं, (धर्म स्वरूप वृष) बैल की सवारी करते हैं, अनगिनत गुण वाले हैं, संसार के आदि कारण हैं, प्रकाश पुञ सदृश्य हैं, भस्मअलंकृत हैं, जो भवानिपति हैं, उन पञ्चमुख (प्रभु) को मैं भजता हूँ।


शिवाकान्त शंभो शशाङ्कार्धमौले
महेशान शूलिञ्जटाजूटधारिन्
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूपः
प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप


हे शिवा (पार्वति) पति, शम्भु! हे चन्द्रशेखर! हे महादेव! आप त्रीशूल एवं जटाजूट धारण करने वाले हैं। हे विश्वरूप! सिर्फ आप ही स्मपुर्ण जगद में व्याप्त हैं। हे पूर्णरूप आप प्रसन्न हों, प्रसन्न हों।

परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं
निरीहं निराकारमोंकारवेद्यम्
यतो जायते पाल्यते येन विश्वं
तमीशं भजे लीयते यत्र विश्वम्


हे एकमात्र परमात्मा! जगत के आदिकारण! आप इक्षारहित, निराकार एवं ॐकार स्वरूप वाले हैं। आपको सिर्फ प्रण (ध्यान) द्वारा ही जान जा सकता है। आपके द्वारा ही सम्पुर्ण सृष्टी की उतपत्ति होती है, आपही उसका पालन करते हैं तथा अंतत: उसका आप में ही लय हो जाता है। हे प्रभू मैं आपको भजता हूँ।


न भूमिर्नं चापो न वह्निर्न वायु-
र्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा
न गृष्मो न शीतं न देशो न वेषो
न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीडे


जो न भुमि हैं, न जल, न अग्नि, न वायु और न ही आकाश, – अर्थात आप पंचतत्वों से परे हैं। आप तन्द्रा, निद्रा, गृष्म एवं शीत से भी अलिप्त हैं। आप देश एव वेश की सीमा से भी परे हैं। हे निराकार त्रिमुर्ति मैं आपकी स्तुति करता हूँ।


अजं शाश्वतं कारणं कारणानां
शिवं केवलं भासकं भासकानाम्
तुरीयं तमःपारमाद्यन्तहीनं
प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम्

हे अजन्मे (अनादि), आप शाश्वत हैं, नित्य हैं, कारणों के भी कारण हैं। हे कल्यानमुर्ति (शिव) आप ही एक मात्र प्रकाशकों को भी प्रकाश प्रदान करने वाले हैं। आप तीनो अवस्ताओं से परे हैं। हे आनादि, अनंत आप जो कि अज्ञान से परे हैं, आपके उस परम् पावन अद्वैत स्वरूप को नमस्कार है।


नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते
नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते
नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य
नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य ॥

हे विभो, हे विश्वमूर्ते आपको नमस्कार है, नमस्कार है। हे सबको आनन्द प्रदान करने वाले सदानन्द आपको नमस्कार है, नमस्कार है। हे तपोयोग ज्ञान द्वारा प्राप्त्य आपको नमस्कार है, नमस्कार है। हे वेदज्ञान द्वारा प्राप्त्य (प्रभु) आपको नमस्कार है, नमस्कार है।


प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ
महादेव शंभो महेश त्रिनेत्र
शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे
त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्यः


हे त्रिशूलधारी ! हे विभो विश्वनाथ ! हे महादेव ! हे शंभो ! हे महेश ! हे त्रिनेत्र ! हे पार्वतिवल्लभ ! हे शान्त ! हे स्मरणिय ! हे त्रिपुरारे ! आपके समक्ष न कोई श्रेष्ठ है, न वरण करने योग्य है, न मान्य है और न गणनीय ही है।


शंभो महेश करुणामय शूलपाणे
गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्
काशीपते करुणया जगदेतदेक-
स्त्वंहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि


हे शम्भो! हे महेश ! हे करूणामय ! हे शूलपाणे ! हे गौरीपति! हे पशुपति ! हे काशीपति ! आप ही सभी प्रकार के पशुपाश (मोह माया) का नाश करने वाले हैं। हे करूणामय आप ही इस जगत के उत्तपत्ति, पालन एवं संहार के कारण हैं। आप ही इसके एकमात्र स्वामि हैं।


त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे
त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ
त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश
लिङ्गात्मके हर चराचरविश्वरूपिन्


हे चराचर विश्वरूप प्रभु, आपके लिंगस्वरूप से ही सम्पुर्ण जगत अपने अस्तित्व में आता है (उसकी उत्तपत्ती होती है), हे शंकर ! हे विश्वनाथ अस्तित्व में आने के उपरांत यह जगत आप में ही स्थित रहता है – अर्थात आप ही इसका पालन करते हैं। अंतत: यह सम्पुर्ण श्रृष्टी आप में ही लय हो जाती है।

विरशैव तत्त्वज्ञान

विरशैव तत्त्वज्ञान.

वीरशैव संप्रदाय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर दक्षिणोत्तर भारतात विस्तरलेला आहे. या संप्रदायाची रंभापूर, उज्जयनी, केदार, श्रीशैल आणि काशी अशी पाच पीठे असून, त्या पीठाधीशांना पंचाचार्य असे म्हटले जाते. पंचाचार्य हेच वीरशैव मताचे संस्थापक होत, असे परंपरा मानते. कर्नाटकात बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी या संप्रदायाचा सामाजिक दृष्टीने विचार करून त्याचा प्रसार - प्रचार केला.

वर शब्दे नोच्यते विद्या शिवजीवैक्य बोधिका |
तस्यां मन्ते ये शैवा वीरशैवास्तु ते मतः || ५-१६ ||

अशी 'सिद्धांतशिखामणी' या ग्रंथात 'वीरशैव' या पदाची व्याख्या केली आहे. 'वी' म्हणजे शिवजीवैक्याचा बोध करणारी विद्या. अशा विद्येत 'र' म्हणजे रत होणारा तो वीरशैव होय, असा या श्लोकाचा आशय आहे.
मायिदेवांनी 'विशेषार्थ प्रकाशिकेत'

वि शब्दोत्र विकल्पार्थो शब्दो हितार्थकः |
विकल्परहितं शैव वीरशैवं इति स्मृतः || २-२० ||

वि = विकल्प, र = रहित अर्थात विकल्परहित तो वीरशैव, असे वीरशैव शब्दाचे स्पष्टीकरण दिले आहे. जो विरोधरहित तो वीरशैव (विरोधरहितं शैव वीरशैवं विदुर्बुधा :- क्रियासार) असेही एक स्पष्टीकरण नीलकंठ शिवाचार्यांनी दिले आहे. ही स्पष्टीकरणे तात्विक अंगांनी केलेली आहेत. वीरवृत्तीने शैवधर्माचा प्रसार करणारे ते वीरशैव, असाही एक सयुक्तिक अर्थ लावला जातो. परमार्थसाधनेत कामक्रोधादी विकारांवर विजय मिळवण्यासाठी एक वीरवृत्ती आवश्यक असते. त्या अर्थानेही शैवांना 'वीर' हे विशेषण लावले असण्याची शक्यता आहे.

वीरशैव तत्त्वज्ञानाचा मूलस्रोत
शंकराने पार्वतीला जो उपदेश केला त्याला 'आगम' असे म्हटले जाते. आगमाचेच पर्यायनाम 'तंत्र' असे आहे. ज्याच्या अध्ययनाने ज्ञानवृद्धी होते ते 'तंत्र' होय. (तन्यते विस्तारयते ज्ञानमनेन) ब्राह्मणतंत्र, बौद्धतंत्र आणि जैनतंत्र असे तंत्राचे तीन प्रकार आहेत. उपास्यदेवतेच्या भेदामुळे ब्राह्मणतंत्राचे शिव , वैष्णव आणि शाक्त असे तीन भाग झाले. वैष्णवागम (पांचरात्रागम) विशिष्टाद्वैताचे, शाक्तागम अद्वैतांचे आणि शैवागम द्वैत-अद्वैत-द्वैताद्वैत-विशिष्टाद्वैत-शक्तिविशिष्टाद्वैत यांचे प्रतिपादन करतात.
(पान क्र.१९७ पूर्ण)-------------------------------------------------------------------------------------
कामिकागमपासून ते वातुलागमापर्यंत अठ्ठावीस आगमांना 'शैवागम' असे म्हणतात. 'सिद्धांतागम' असेही त्यांचे एक पर्यायनाम आहे. उपनिषदांना 'वेदान्त' आणि आगमांना 'सिद्धांत' असे संबोधिले जाते. १ कामिक, २ योगज, ३ चिन्त्य, ४ कारण, ५ अजित, ६ दीप्त, ७ सूक्ष्म, ८ सहस्र, ९ अंशुमान, १० सुप्रभेद, ११ विजय, १२ निश्वास, १३ स्वायंभूव, १४ अनल , १५ वीर ,१६ रौरव, १७ मकुट, १८ विमल, १९ चंद्रज्ञान, २० बिंब, २१ प्रोद्गीत्, २२ ललित, २३ सिद्ध, २४ संतान, २५ शर्वोक्त, २६ पारमेश्वर, २७ किरण आणि २८ वातुल असे अठ्ठावीस शैवागम होत. यांपैकी पहिले दहा आगम शिवाकडून आणि पुढील अठरा रुद्राकडून उपदेशिलेले आहेत. विद्वानांनी आगमांचा काल वेदांइतकाच प्राचीन मानलेला आहे. अठ्ठावीस आगमांपैकी फारच थोडे आगम आज उपलब्ध आहेत.
आगमांमध्ये क्रियापाद, चर्यापाद, योगपाद आणि ज्ञानपाद असे चार विभाग असतात. क्रियापादात देवालयाची स्थापना, मूर्तीचे निर्माण व प्रतिष्ठापना या विषयाचे प्रतिपादन असते. चर्यापादात मूर्तीची पूजा, उत्सवादि विषयांचे निरुपण, योगपादात अष्टांगयोग साधना आणि ज्ञानपादात दार्शनिक विषय वर्णिलेले असतात. हे शैवांगमंच वीरशैव तत्त्वज्ञानाचा मूलस्रोत होय. अठ्ठावीस शैवागमांपैकी पहिल्या दहा आगमांचा स्वीकार करून द्वैतवादी सिदधांत-शैवदर्शन निर्माण झाले. पुढील अठरा आगमांना प्रमाण मानून अद्वैतवादी काश्मीर शैवदर्शन निर्माण झाले. परंतु, वीरशैवाचार्यांनी सर्व अठ्ठावीस शैवागमांचा स्वीकार करून समन्वयात्मक तत्त्वज्ञान प्रस्थापित केले. शक्तिविशिष्टाद्वैत, षट्स्थलसिद्धांत, अष्टावरण आणि पंचाचार ही वीरशैव संप्रदायाची चार प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. उपनिषदांचे सार जसे भग्वद्गीतेत संकलित झाले, त्याप्रमाणे शैवागमांचे सार शिवयोगी शिवाचार्यांच्या 'सिद्धांतशिखामणी' या ग्रंथात संग्रहित झालेले आहे. म्हणून या ग्रंथाला 'वीरशैवांचा धर्मगंथ' अशी प्रतिष्ठा लाभली आहे.

वीरशैव

वीरशैव पंथ एक ऐसी परम्परा है जिसमें भक्त शिव परम्परा से बन्धा हो । यह हिन्दू धर्मं की सबसे बड़ी शाखा है, यह दक्षिण भारत में बहुत लोकप्रिय हुई है। ये वेदों पर आधारित पंथ है, ये भारत का तीसरा सबसे बड़ा पंथ है पर इसके ज़्यादातर उपासक कर्नाटक में हैं और भारत का दक्षिण राज्यो महाराष्ट्र आंद्रप्रदेश केरला ओर तमिलनाड मे वीरशैव उपासक अदिक्तम है । ये एकेश्वरवादी धर्म है। तमिल में इस को शिवाद्वैत धर्म अथवा लिंगायत पंथ भी कहते हैं। उत्तर भारत में इस पंथ का औपचारिक नाम " शैवा आगम" है।
वीरशैव की सभ्यता को द्राविड सभ्यता कहते हैं । इतिहासकारों के दृष्टिकोण के अनुसार लगभग 1700 ईसापूर्व में वीरशैव अफ़्ग़ानिस्तान, कश्मीर, पंजाब और हरियाणा में बस गये । तभी से वो लोग (उनके विद्वान आचार्य ) अपने भगवान शिव को प्रसन्न करने के लिये वैदिक संस्कृत में मन्त्र रचने लगे । पहले चार वेद मे शिव भगवान को परमब्रह्म प्रतिपादन को प्रमाण किया श्रीकर भाष्य ने , जिनमें ऋग्वेद प्रथम था । उसके बाद जगद्गुरु श्री वागिश पंडितारध्य शिवाचार्य उपनिषद जैसे ग्रन्थ को प्रस्थान त्रय ग्रन्थ मे शिवोत्तम का प्रतिपाध्य किया गये।
वीरशैव पंथ में शिवाद्वैत अथवा षटस्थल सिद्धान्त है जिसे सभी वीरशैव को मानना ज़रूरी है । ये तो पंथ से ज़्यादा एक अध्यात्म साधन का मार्ग है । वीरशैव का कोई केन्द्रीय धर्मसंगठन नहीं है, और न ही कोई "धर्मं मुखिया" । लेकिन इनके जगद्गुरु ही इनके धर्माधिकारी या पन्थाधिकारी है । इसकी अन्तर्गत कई मत और सम्प्रदाय आते हैं, और सभी को बराबर श्रद्धा दी जाती है । धर्मग्रन्थ भी कई हैं । फ़िर भी, वो मुख्य सिद्धान्त, जो ज़्यादातर वीरशैव मानते हैं, इन सब में विश्वास : धर्म (वैश्विक क़ानून), कर्म (और उसके फल), पुनर्जन्म का सांसारिक चक्र, मोक्ष (सांसारिक बन्धनों से मुक्ति--जिसके कई रास्ते हो सकते हैं), और बेशक, ईश्वर । वीरशैव साम्प्रदाय स्वर्ग और नरक को अस्थायी मानता है । वीरशैव साम्प्रदाय के अनुसार संसार के सभी प्राणियों में आत्मा होती है । मनुष्य ही ऐसा प्राणी है जो इस लोक में पाप और पुण्य, दोनो कर्म भोग सकता है, और मोक्ष प्राप्त कर सकता है । 
वीरशैव पंथ में चार मुख्य साम्प्रदाय हैं :
१) बसवादि शरण साम्प्रदाय ह, 
२)आचार्य साम्प्रदाय 
)नायनार साम्प्रदाय (तमिळ शैव साम्प्रदाय) 
४) कश्मीरि शैव साम्प्रदाय (जो सबि शिव को परमेश्वर मानते हैं), देवी को परमेश्वरि मानते हैं ।