Tuesday, 20 May 2014

गोशाला उदघाटन @ हिरेमठ संस्थान बेळंकी (तालुका मिरज जिल्हा सांगली)

गोशाला  उदघाटन 

 @ हिरेमठ संस्थान बेळंकी (तालुका मिरज जिल्हा सांगली)


 kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji & shat sthal bramhi shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki


kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji & shat sthal bramhi shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki

kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji & shat sthal bramhi shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki


GOPUJAN.....
kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji & shat sthal bramhi shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki


kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji 

SHUBH RANGOLI

GOPUJAN....
                                shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki

kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji & shat sthal bramhi shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki

GOSHALA OPENING BELANKI
kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji & shat sthal bramhi shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki

GOSHALA OPENING BELANKI
kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji & shat sthal bramhi shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki

GOSHALA OPENING BELANKI
kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji & shat sthal bramhi shri shri shri 108 shivling shivacharya belankikar maswamiji Belanki

GURU PAD PUJA...
                       kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji

GURU SEVA



    kashi jagadguru shri shri shri 1008 chandrashekhar shivacharya mahaswamiji



VANDE GOMATRAM

" श्री शिवलीलामृत कथासार " अध्याय दुसरा

" श्री शिवलीलामृत कथासार "

अध्याय दुसरा



ः॥ जेथें सर्वदा शिवस्मरण ॥ तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण ॥ नाना संकटें विघ्नें दारुण ॥ न बाधती कालत्रयी ॥१॥ संकेतें अथवा हास्येंकरून ॥ भलत्या मिसें घडो शिवस्मरण ॥ न कळतां परिसासी लोह जाण ॥ संघटतां सुवर्ण करी कीं ॥२॥ न कळतां प्राशिलें अमृत ॥ परी अमर करी कीं यथार्थ ॥ औषधी नेणतां भक्षित ॥ परी रोग सत्य हरी कीं ॥३॥ शुष्कतृणपर्वत अद्भुत ॥ नेणतां बाळक अकस्मात ॥ अग्निस्फुलिंग टाकीत ॥ परी भस्म यथार्थ करी कीं ॥४॥ तैसे न कळतां घडे शिवस्मरण ॥ परी सकळ दोषां होय दहन ॥ अथवा विनोदेंकरून ॥ शिवस्मरण घडो कां ॥५॥ हे कां व्यर्थ हांका फोडिती ॥ शिव शिव नामें आरडती ॥ अरे कां हे उगे न राहती ॥ हरहर गर्जती वेळोवेळां ॥६॥ शिवनामाचा करिती कोल्हाळ ॥ माझें उठविलें कपाळ ॥ शिव शिव म्हणतां वेळोवेळ ॥ काय येतें यांच्या हाता ॥७॥ ऐसी हेळणा करी क्षणक्षणीं ॥ परी उमावल्लभनाम ये वदनीं ॥ पुत्रकन्यानामेंकरूनी ॥ शिवस्मरण घडो कां ॥८॥ महाप्रीतीनें करितां शिवस्मरण ॥ आदरें करितां शिवध्यान ॥ शिवस्वरूप मानूनी ब्राह्मण ॥ संतर्पण करी सदां ॥९॥ ऐसी शिवीं आवडी धरी ॥ त्याहीमाजी आली शिवरात्री ॥ उपवास जागरण करी ॥ होय बोहरी महत्पापा ॥१०॥ ते दिवशीं बिल्वदळें घेऊन ॥ यथासांग घडलें शिवार्चन ॥ तरी सहस्त्रजन्मींचे पाप संपूर्ण ॥ भस्म होऊन जाईल ॥११॥ नित्य बिल्वदळें शिवासी वाहत ॥ त्याएवढा नाहीं पुण्यवंत ॥ तो तरेल हें नवल नव्हे सत्य ॥ त्याच्या दर्शनें बहुत तरती ॥१२॥ प्रातःकाळी घेतां शिवदर्शन ॥ यामिनीचें पाप जाय जळोन ॥ पूर्वजन्मींचें दोष गहन ॥ माध्यान्हीं दर्शन घेतां नुरती ॥१३॥ सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम ॥ सप्तजन्मींचें पाप होय भस्म ॥ शिवरात्रीचा महिमा परम ॥ शेषही वर्णू शकेना ॥१४॥ कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण ॥ महोदय गजच्छाया ग्रहण ॥ इतुकेही पर्वकाळ ओंवाळून ॥ शिवरात्रीवरून टाकावें ॥१५॥ शिवरात्री आधींचि पुण्यदिवस ॥ त्याहीवरी पूजन जागरण विशेष ॥ त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष ॥ त्याच्या पुण्यासी पार नाहीं ॥१६॥ वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर ॥ सुरगण गंधर्व किन्नर ॥ सिद्ध चारण विद्याधर ॥ शिवरात्रिव्रत करिताती ॥१७॥ यदर्थी सुरस कथा बहुत ॥ शौनकादिकां सांगे सूत ॥ ती श्रोतीं ऐकावी सावचित्त ॥ अत्यादरेंकरूनियां ॥१८॥ तरी मासांमाजी माघमास ॥ ज्याचा व्यास महिमा वर्णीं विशेष ॥ त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस ॥ मुख्य शिवरात्रि जाणिजे ॥१९॥ विंध्याद्रिवासी एक व्याध ॥ मृगपक्षिघातक परमनिषिध्द ॥ महानिर्दय हिंसक निषाद ॥ केले अपराध बहु तेणें ॥२०॥ धनुष्यबाण घेऊनि करीं ॥ पारधीसी चालिला दुराचारी ॥ पाश वागुरा कक्षेसी धरी ॥ कवच लेत हरितवर्ण ॥२१॥ करीं गोधांगुलित्राण ॥ आणिकही हातीं शस्त्रसामुग्री घेऊन ॥ काननीं जातां शिवस्थान ॥ शोभायमान देखिलें ॥२२॥ तंव तो शिवरात्रीचा दिन ॥ यात्रा आली चहुंकडून ॥ शिवमंदिर श्रुंगारून ॥ शोभा आणिली कैलासींची ॥२३॥ शुद्धरजततगटवर्ण ॥ देवालय झळके शोभायमान ॥ गगनचुंबित ध्वज पूर्ण ॥ रत्नजडित कळस तळपताती ॥२४॥ मध्यें मणिमय शिवलिंग ॥ भक्त पूजा करिती सांग ॥ अभिषेकधारा अभंग ॥ विप्र धरिती रुद्रघोषें ॥२५॥ एक टाळ मृदंग घेऊन ॥ सप्रेम करिती शिवकीर्तन ॥ श्रोते करटाळी वाजवून ॥ हरहरशब्दें घोष करिती ॥२६॥ नाना परिमळद्रव्यसुवास ॥ तेणें दशदिशा दुमदुमिल्या विशेष ॥ लक्ष दीपांचे प्रकाश ॥ जलजघोष घंटारव ॥२७॥ शशिमुखा गर्जती भेरी ॥ त्यांचा नाद न माये अंबरी ॥ एवं चतुर्विध वाद्यें नानापरी ॥ भक्त वाजविती आनंदे ॥२८॥ तो तेथें व्याध पातला ॥ समोर विलोकी सर्व सोहळा ॥ एक मुहूर्त उभा ठाकला ॥ हांसत बोलिला विनोदे ॥२९॥ हे मूर्ख अवघे जन ॥ येथें द्रव्य काय व्यर्थ नासोन ॥ आंत दगड बाहेरी पाषाण ॥ देवपण येथें कैचें ॥३०॥ उत्तम अन्न सांडून ॥ व्यर्थ कां करिती उपोषण ॥ ऐसिया चेष्टा करीत तेथून ॥ काननाप्रती जातसे ॥३१॥ लोक नामें गर्जती वारंवार ॥ आपणहि विनोदें म्हणे शिव हर हर ॥ सहज सव्य घालूनि शिवमंदिर ॥ घोर कांतार प्रवेशला ॥३२॥ वाचेसी लागला तोचि वेध ॥ विनोदें बोले शिव शिव शब्द ॥ नामप्रतापें दोष अगाध ॥ झडत सर्व चालिले ॥३३॥ घोरांदर सेवितां वन ॥ नाढळतीच जीव लघुदारूण ॥ तों वरूणदिग्वधूचें सदन ॥ वासरमणि प्रवेशला ॥३४॥ निशा प्रवर्तली सबळ ॥ कीं ब्रह्मांडकरंडा भरलें काजळ ॥ कीं विशाळ कृष्णकंबळ ॥ मंडप काय उभारिला ॥३५॥ विगतधवा जेवींकामिनी ॥ तेवीं न शोभे कदा यामिनी ॥ जरी मंडित दिसे उडुगणीं ॥ परी पतिहीन रजनी ते ॥३६॥ जैसा पंडित गेलियासभेंतून॥ मूर्ख जल्पती पाखंडज्ञान ॥ जेवीं अस्ता जातां सहस्त्रकिरण ॥ उडुगणें मागें झळकती ॥३७॥ असो ऐसीनिशादाटलीसुबद्ध ॥ अवघा वेळ उपवासी निषाद ॥ तों एक सरोवर अगाध ॥ दृष्टीं देखिलें शोधितां ॥३८॥ अनेक संपत्ती सभाग्यसदनीं ॥ तेवीं सरोवरी शोभती कुमुदिनी ॥ तटीं बिल्ववृक्ष गगनीं ॥ शोभायमान पसरला ॥३९॥ योगभ्रष्ट कर्मभूमीसी पावती जनन ॥ तेवीं बिल्वडहाळिया गगनींहून ॥ भूमीस लागल्या येऊन ॥ माजी रविशशिकिरण न दिसे ॥४०॥ त्यांत तम दाटलें दारूण ॥ माजी बैसल्या व्याध जाऊन ॥ शरासनीं शर लावून ॥ कानाडी ओढोन सावज लक्षी ॥४१॥ दृष्टीं बिल्वदळें दाटलीं बहुत ॥ तीं दक्षिणहस्तें खुडोनि टाकीत ॥ तो तेथें पद्मजहस्तें स्थापित ॥ शिवलिंग दिव्य होतें ॥४२॥ त्यावरी बिल्वदळें पडत ॥ तेणें संतोषला अपर्णानाथ ॥ व्याधासी उपवास जागरण घडत ॥ सायास न करितां अनायासें ॥४३॥ वाचेसी शिवनामाचा चाळा ॥ हर हर म्हणे वेळोवेळां ॥ पापक्षय होत चालिला ॥ पूजन स्मरण सर्व घडलें ॥४४॥ एक याम झालिया रजनी ॥ तों जलपानालागीं एक हरिणी ॥ आली तेथें ते गर्भिणी ॥ परम सुकुमार तेजस्वी ॥४५॥ व्याध तिणें लक्षिला दुरून ॥ कृतांतवत परम दारुण ॥ आकर्ण ओढिला बाण ॥ देखोनि हरिणी बोलतसे ॥४६॥ म्हणे महापुरुषा अन्यायाविण ॥ कां मजवरी लाविला बाण ॥ मी तव हरिणी आहे गर्भिण ॥ वध तुवां न करावा ॥४७॥ उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान ॥ वधितां दोष तुज दारुण ॥ एक रथभरी जीव वधितां सान ॥ तरी एक बस्त वधियेला ॥४८॥ शत बस्त वधितां एक ॥ वृषभहत्येचें पातक ॥ शत वृषभ तैं गोहत्या देख ॥ घडली शास्त्र वदतसे ॥४९॥ शत गोहत्येचें पातक पूर्ण ॥ एक वघितां होय ब्राह्मण ॥ शत ब्रह्महत्येचें पातक जाण ॥ एक स्त्री वधिलिया ॥५०॥ शत स्त्रियांहूनि अधिक ॥ एक गुरुहत्येचें पातक ॥ त्याहूनि शतगुणी देख ॥ एक गर्भिणी विधिलिया ॥५१॥ तरी अन्याय नसतां ये अवसरीं ॥ मज मारिसी कां वनांतरी ॥ व्याध म्हणे कुटुंब घरी ॥ उपवासी वाट पहात ॥५२॥ मीही आजि निराहार ॥ अन्न नाहींच अणुमात्र ॥ परी मृगी होऊनि सुंदर ॥ गोष्टी वद्सी शास्त्रींच्या ॥५३॥ मज आश्चर्य वाटतें पोटीं ॥ नराऐशा सांगसी गोष्टी ॥ तुज देखोनियां दृष्टीं ॥ दया हृदयीं उपजतसे ॥५४॥ पूर्वीं तुं होतीस कोण ॥ तुज एवढें ज्ञान कोठून ॥ तूं विशाळनेत्री रूप लावण्य ॥ सर्व वर्तमान मज सांगे ॥५५॥ मृगी म्हणे ते अवसरीं ॥ पूर्वी मंथन करितां क्षीरसागरीं ॥ चतुर्दश रत्ने काढिलीं सुरासुरीं ॥ महाप्रयत्नेंकरूनियां ॥५६॥ त्यांमाजी मी रंभा चतुर ॥ मज देखोनि भुलती सुरवर ॥ नाना तपें आचरोनि अपार ॥ तपस्वी पावती आम्हांतें ॥५७॥ म्यां नयनकटाक्षजाळें पसरून ॥ बांधिले निर्जरांचें मनमीन ॥ माझिया अंगसुवासा वेधून ॥ मुनिभ्रमर धांवती ॥५८॥ माझे गायन ऐकावया सुरंग ॥ सुधापानीं धांवती कुरंग ॥ मी भोगीं स्वर्गीचे दिव्य भोग ॥ स्वरूपें न मानी कोणासी ॥५९॥ मद अंगी चढला बहुत ॥ शिवभजन टाकिलें समस्त ॥ शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत ॥ शिवार्चन सांडिलें म्यां ॥६०॥ सोडोनियां सुधापान ॥ करूं लागलें मद्यप्राशन ॥ हिरण्यनामा दैत्य दारूण ॥ सुर सोडोनि रतले त्यांसी ॥६१॥ ऐसा लोटला काळ अपार ॥ मृगयेसी गेला तो असुर ॥ त्या दुष्टासंगे अपर्णावर ॥ भजनपूजन विसरलें ॥६२॥ मनासी ऐसें वाटलें पूर्ण ॥ असुर गेला मृगयेलागून ॥ इतुक्यांत घ्यावें शिवदर्शन ॥ म्हणोनि गेलें कैलासा ॥६३॥ मज देखतां हिमनगजामात ॥ परम क्षोभोनि शाप देत ॥ तूं परम पापिणी यथार्थ ॥ मृगी होई मृत्युलोकीं ॥६४॥ तुझ्या सख्या दोघीजणी॥ त्या होतील तुजसवं हरिणी ॥ हिरण्य असुर माझिये भजनीं ॥ असावध सर्वदा ॥६५॥ तोही मृग होऊनि सत्य ॥ तुम्हांसींचि होईल रत ॥ ऐक व्याधा सावचित्त ॥ मग म्यां शिव प्रार्थिला ॥६६॥ हे पंचवदना विरूपाक्षा ॥ सच्चिदानंदा कर्माधक्षां॥ दक्षमखदळणा सर्वासाक्षा ॥ उ:शाप देईं आम्हांतें ॥६७॥ भोळा चक्रवर्ती दयाळ ॥ उःशाप वदला पयःफेनधवल ॥ द्वादश वर्षे भरतां तात्काळ ॥ पावाल माझिया पदातें ॥६८॥ स्वस्थळा जाऊन ॥ सत्वर येतें गर्भ ठेवून ॥ मग तूं सुखें घेई प्राण ॥ सत्य वचन हें माझें ॥७०॥ ऐसी मृगी बोलिली सावचित्त ॥ त्यावरी तो व्याध काय बोलत ॥ तूं गोड बोलसी यथार्थ ॥ परी विश्वास मज न वाटे ॥७१॥ नानापरी असत्य बोलोन ॥ करावें शरीराचें संरक्षण ॥ हें प्राणीमात्रासी आहे ज्ञान ॥ तरी तूं शपथ वदें आतां ॥७२॥ महत्पापें उच्चारून ॥ शपथ वदें यथार्थ पूर्ण ॥ यावरी ते हरिणी दीनवदन ॥ वाहत आण ऐका ते ॥७३॥ ब्राह्मणकुळीं उपजोन ॥ जो न करी वेदशास्त्रध्ययन ॥ सत्यशौचवर्जित संध्याहीन ॥ माझे शिरीं पातक तें ॥७४॥ एक वेदविक्रय करीती पूर्ण ॥ कृतघ्न परपीडक नावडे भजन ॥ एक दानासी करिती विघ्न ॥ गुरु निंदाश्रवण एक करिती ॥७५॥ रमावराउमावरांची निंदा ॥ त्या पापाची मज होय आपदा ॥ दान दिधलें जें ब्रह्मवृंदा ॥ हिरोनी घेती माघारें ॥७६॥ एक यतिनिंदा करिती ॥ एक शास्त्रें पहाती द्वैत निर्मिती ॥ नाना भ्रष्टमार्ग आचरती ॥ स्वधर्म आपुला सांडोनियां ॥७७॥ देवायला माजी जाऊनी ॥ हरिकथापुराणश्रवणीं ॥ जे बैसती विडा घेउनी ॥ ते कोडी होती पापिये ॥७८॥ जे देवळांत करितीस्त्रीसंभोग ॥ कीं स्त्रीभ्रतारांसी करिती वियोग ॥ ते नपुंसक होऊनि अभाग्य ॥ उपजती या जन्मीं ॥७९॥ वर्मकर्मे निंदा करीत ॥ तो जगपुरीषभक्षक काग होत ॥ शिष्यांसी विद्या असोनि न सांगत ॥ तो पिंगळा होत निर्धारें ॥८०॥ अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती ॥ त्यानिमित्तें गंडमाळा होती ॥ परक्षेत्रींच्या गाई वळूनि आणिती ॥ ते अल्पायुषी होती याजन्मीं ॥८१॥ जो राजा करी प्रजापीडण ॥ तो या जन्मीं व्याघ्र कां सर्प होय दारूण ॥ वृथा करी साधुछळण ॥ निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥८२॥ स्त्रिया व्रतनेम करीत ॥ भ्रतारासी अव्हेरीत ॥ धनधान्य असोनि वंचित ॥ त्या वाघुळा होती या जन्मीं ॥८३॥ पुरूष कुरूप म्हणोनियां त्यागिती ॥ त्या या जन्मीं बालविधवा होती ॥ तेथेंही जारकर्म करिती ॥ मग त्या होती वारांगना ॥८४॥ ज्या भ्रतारासी निर्भर्त्सिती ॥ त्या दासी किंवा कुलटा होती ॥ सेवक स्वामीचा द्रोह करिती ॥ ते जन्मा येती श्वानाच्या ॥८५॥ सेवकापासूनि सेवा घेऊन ॥ त्याचें न दे जो वेतन ॥ तो अत्यंत भिकारी होऊन ॥ दारोदारी हिंडतसे ॥८६॥ स्त्रीपुरुष गुज बोलतां ॥ जो जाऊनि ऐके तत्वतां ॥ त्याची स्त्री दुरावे हिंडतां ॥ अन्न न मिळे तयातें ॥८७॥ जे जारणमारण करिती ॥ ते भूत प्रेत पिशाच होती ॥ यती उपवासें पीडिती ॥ त्यांते दुष्काळ जन्मवरी ॥८८॥ स्त्री रजस्वला होऊनी ॥ गृहीं वावरें जे पापिणी ॥ पूर्वज रुधिरीं पडती पतनीं ॥ त्या गृही देव पितृगण न येती ॥८९॥ जे देवाच्या दीपांचें तोत नेती ॥ ते या जन्मीं निपुत्रिक होती ॥ ज्या रांधितां अन्न चोरोनी भक्षिती ॥ त्या मार्जारी होती या जन्मीं ॥९०॥ ब्राह्मणांसी कदन्न घालून ॥ आपण भक्षिती षड्रसपक्वान ॥ त्यांचे गर्भ पडती गळोन ॥ आपुलिया कर्मवशें ॥९१॥जो मातापित्यांसी शिणवीत ॥ तो ये जन्मी मर्कट होत ॥ सासुश्वशुरा स्नुषा गांजित ॥ तरी बाळक न वांचे तियेचें ॥९२॥ मृगी म्हणे व्याधालागून ॥ जरी मी न ये परतोन ॥ तरी हीं महत्पापें संपूर्ण ॥ माझ्या माथां बैसोत ॥९३॥ हे मिथ्या गोष्ट होय साचार ॥ तरी घडो शिवपूजेचा अपहार ॥ ऐसी शपथ ऐकतां निर्धार ॥ व्याध शंकला मानसी ॥९४॥ म्हणे पतिव्रते जाई आतां ॥ सत्वर येई निशा सरतां ॥ हरिणी म्हणे शिवपदासी तत्वतां ॥ पुण्यवंता जाशील ॥९५॥ उदकपान करूनि वेगीं ॥ निजाश्रमा गेली कुरंगी ॥ इकडे व्याघ्र दक्षिणभार्गी ॥ टाकी बिल्वदळे खुडूनियां ॥९६॥ दोन प्रहर झाली यामिनी ॥ द्वितीय पूजा शिवें मानुनी ॥ अर्धपाप जळालें मुळींहुनी ॥ सप्तजन्मींचें तेधवां ॥९७॥ नामीं आवडजडली पूर्ण ॥ व्याध करी शिवस्मरण ॥ मृगीमुखें ऐकिलें निरूपण ॥ सहज जागरण घडलें तया ॥९८॥ तों दुसरी हरिणी अकस्मात ॥ पातली तेथें तृषाक्रांत ॥ व्याधे बाण ओढीतां त्वरित ॥ करुणा भाकी हरिणी ते ॥९९॥ म्हणे व्याधा ऐक ये समयी ॥ मज कामानळें पीडीलें पाहीं ॥ पतीसी भोग देऊनि लवलाही ॥ परतोनि येतें सत्वर ॥१००॥ व्याध आश्चर्य करी मनांत ॥ म्हणे शपथ बोलोनि जाई त्वरित ॥ धन्य तुमचे जीवित्व ॥ सर्व शास्त्रार्थ ठाउका ॥१॥ चापी तडाग सरोवर ॥ जो पतित मोडी देवागार ॥ गुरुनिंदक मद्यपानी दुराचार ॥ तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ॥२॥ महाक्षत्रिय आपण म्हणवित ॥ समरांगणी मागें पळत ॥ वृत्ति हरी सीमा लोटित ॥ ग्रंथ निंदित महापुरूषांचे ॥३॥ वेदशास्त्रांची निंदा करी ॥ संतभक्तांसी द्वेष धरी ॥ हरिहर चरित्रें अव्हेरी ॥ माझे शिरीं तीं पापें ॥४॥ धनधान्य असोनि पाहीं ॥ पतीलागीं शिणवी म्हणे नाहीं ॥ पति सांडोनि निजे परगृही ॥ तीं पापे माझिया माथां ॥५॥ पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्तता ॥ त्यांसी व्यर्थची गाजिती जे नं पाहंतां ॥ ते कुरुप होती तत्वतां ॥ हिंडता भिक्षा न मिळेचि ॥६॥ बंधुबंधु जे वैर करिती ॥ ते या जन्मीं मत्स्य होती ॥ गुरुचें उणें जे पाहती ॥ त्यांची संपत्ति दग्ध होय ॥७॥ जे मार्गस्थांचीं वस्त्रे हरिती ॥ ते अतिशूद्र प्रेतवस्त्रें पांघरती ॥ आम्ही तपस्वी म्हणोनिया अनाचार करिती ॥ ते घुले होती मोकाट ॥८॥ दासी स्वामीची सेवा न करी ॥ ती ये जन्मी होय मगरी ॥ जो कन्याविक्रय करी ॥ हिंसक योनी निपजे तो ॥९॥ स्त्री भ्रताराची सेवा करीत ॥ तीस जो व्यर्थचि गांजित ॥ त्याचा गृहभंग होत ॥ जन्मजन्मांतरी न सुटे ॥११०॥ ब्राह्मण करी रसविक्रय ॥ घेतां देतां मद्यपी होय ॥ जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे ॥ तो होय ब्रह्मराक्षस ॥११॥ एकें उपकार केला ॥ जो नष्ट नाठवी त्याला ॥ तो कृतघ्न जंत झाला ॥ पूर्वकर्मे जाणिजे ॥१२॥ विप्र श्राध्दीं जेवुनी ॥ स्त्रीभोग करी ते दिनीं ॥ तो श्वानसुकरयोनीं ॥ उपजेल नि:संशये ॥१३॥ व्यवहारी दहांत बैसोन ॥ खोटी साक्ष देई गर्जोन ॥ पूर्वज नरकीं पावती पतन ॥ असत्य साक्ष देतांचि ॥१४॥ दोघी स्त्रिया करून ॥ एकीचेंच राखी जो मन ॥ तो गोचिड होय जाण ॥ सारमेय शरीरी ॥१५॥ पूर्वजन्मीं कोंडी उदक ॥ त्याचा मळमूत्रनिरोध देख ॥ करितां साधुनिंदा आवश्यक ॥ सत्वर दंत भग्न होती ॥१६॥ देवालयीं करी भोजन ॥ तरी ये जन्मी होय क्षीण ॥ पृथ्वीपंतीची निंदा करितां जाण ॥ उदरीं मंदाग्नि होय पैं ॥१७॥ग्रहणसमयीं करी भोजन ॥ त्यासी पित्तरोग हो दारुण ॥ परबाळें विकी परदेश नेऊन ॥ तरी सर्वांगीं कुष्ठ भरे ॥१८॥ जीस्त्रीकरी गर्भपातन ॥ तीउपजे वंध्या होऊन ॥ देवालय टाकी पाडोन ॥ तरी अंगभंग होय त्याचा ॥१९॥ अपराधाविण स्त्रीसी गांजिताहे ॥ त्याचें ये जन्मीं एक अंग जाये ॥ ब्राह्मणाचें अन्न हरिती पापिये ॥ त्यांचा वंश न वाढे कधीं ॥१२०॥ गुरु संत माता पिता ॥ त्यांसी होय जो निर्भर्त्सिता ॥ तरी वाचा जाय तत्वतां ॥ अडखळे बोलतां क्षणाक्षणां ॥२१॥ जो ब्राह्मणांसी दंड भारी ॥ त्यासी व्याधितिडका लागती शरीरीं ॥ जो संतासीं वादविवाद करी ॥ दीर्घ दंत होती त्याचे ॥२२॥ देवद्वारींचे तरुवर ॥ अश्वत्थादि वृक्ष साचार ॥ तोडितां पांगुळ होय निर्धार ॥ भिक्षा न मिळे हिंडातां ॥२३॥ जो सूतकान्न भक्षित ॥ त्याचे उदरीं नाना रोग होत ॥ आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त ॥ तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ॥२४॥ ब्राह्मणाचें ऋण न देतां ॥ तरी बाळपणीं मृत्यु पावे पिता ॥ जलवृक्षाच्छाया मोडितां ॥ तरी एकही स्थळ न मिळे त्यातें ॥२५॥ ब्राह्मणासी आशा लावून ॥ चाळवी नेदी कदा दान ॥ तो ये जन्मीं अन्न अन्न ॥ करीत हिंडे घरोघरीं ॥२६॥ जो पुत्रद्वेंष करीत ॥ आणि दरिद्रियाचें लग्न मोडित ॥ तरी स्त्रीसी सल राहे पोटांत ॥ वंध्या निश्चित संसारी ॥२७॥ जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहून ॥ त्यासी सांडसें तोडी सुर्यनंदन ॥ जो नायके कथाग्रंथ पावन ॥ बधिर होय जन्मोजन्मी ॥२८॥ जो पीडी मातापितयांस ॥ त्याचा सर्वदा होई कार्यनाश ॥ एकासी भजे निंदी सर्व देवांस ॥ तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥२९॥ जो चांडाळ गोवध करी ॥ त्यासी मिळे कर्कश नारी ॥ वृषभ वधितां निर्धारीं ॥ शतमूर्ख पुत्र होय त्यासी ॥१३०॥ उदकतृणेंविण पशु मारीत ॥ तरी मुक्याचि प्रजा होती समस्त ॥ जो पतिव्रतेसी भोगूं इच्छित ॥ तरी कुरूप नारी कर्कशा मिळे ॥३१॥ जो पारधी बहु जीव संहारी ॥ तो फेंपरा होय संसारी ॥ गुरूचा त्याग जो चांडाळ करी ॥ तो उपजतांचि मृत्यु पावे ॥३२॥ नित्य अथवा रविवरीं मुते रवीसमोर ॥ त्याचे बाळपणीं दंत भग्न केश शुभ्र ॥ जे मृत बाळासाठीं रूदती निर्धार॥ त्यांस हांसता निपुत्रिक होय ॥३३॥ हरिणी म्हणे व्याधालागून ॥ मी सत्वर येतें पतीसी भोग देऊन ॥ न यें तरी हीं पापें संपूर्ण ॥ माझ्या माथां बैसोत पैं ॥३४॥ व्याध मनांत शंकोन ॥ म्हणे धन्य धन्य तुमचें ज्ञान ॥ सत्वर येई गृहासी जाऊन ॥ सत्य संपूर्ण सांभाळी ॥३५॥ जलपान करूनि वेगीं ॥ आश्रम गेली ते कुरंगी ॥ तों मृगराज तेचि प्रसंगीं ॥ जलपानार्थ पातला ॥३६॥ व्याधें ओढिला बाण ॥तों मृग बोले दीनवदन ॥ म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण ॥ त्यांसी पुसोन येतों मी ॥३७॥ शपथ ऐकें त्वरित ॥ कीर्तन करिती प्रेमळ भक्त ॥ तो कथारंग मोडितां निर्वंश होत ॥ तें पाप सत्य मम माथां ॥३८॥ ब्रह्मकर्म वेदोक्त ॥ शुद्र निजांगे आचरत ॥ तो अधम नरकीं पडत ॥ परधर्म आचरतां ॥३९॥ तीर्थयात्रेसी विघ्नें करी ॥ वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी ॥ तरी सर्वांगी व्रण अघोरीं ॥ नरकीं पडे कल्पपर्यंत ॥१४०॥ शास्त्रकोशीं नाहीं प्रमाण ॥ कूटकविता करी क्षुद्र लक्षून ॥ हरिती ब्राह्मणांचा मान ॥ तरी संतान तयांचे न वाढे ॥४१॥ हरिदिनीं शिवदिनी उपोषण ॥ विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण ॥ तरी हस्त पाद क्षीण ॥ होती त्याचे निर्धारें ॥४२॥ एक शिवहरीप्रतिमा फोडिती ॥ एक भगवद्भक्तां विघ्नें करिती ॥ एक शिवमहिमा उच्छेदिती ॥ नरसीं होती कीटक ते ॥४३॥ मातृद्रोही त्यासी व्याधी भरे ॥ पितृद्रोही पिशाच विचरे ॥ गुरुद्रोही तात्काळ मरे ॥ भूतप्रेतगणीं विचरे तो ॥४४॥ विप्र आहार बहुत जेविती ॥ त्यांसी जो हांसे दुर्मती ॥ त्याचे मुखीं अहोचक्ररोग निश्चि ती॥ न सोडती जन्मवरी ॥४५॥ एक गोविक्रय करिती ॥ एक कन्याविक्रय अर्जिती ॥ ते नर मार्जार मस्त होती ॥ बाळें भक्षिती आपुलीं ॥४६॥ जो कन्या भगिनी अभिलाषी ॥ कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी ॥ प्रमेहरोग होय त्यासी ॥ कीं खडा गुह्यांत दाटत ॥४७॥ प्रासादभंग लिंगभंग करी ॥ देवांचीं उपकरणें अलंकार चोरी ॥ देवप्रतिष्ठा अव्हेरी ॥ पंडुरोग होय ॥४८॥ एक मित्रद्रोह विश्वासघात करिती ॥ मातृपितृहत्या गुरूसी संकटी पाडिती ॥ ब्रह्मवध गोवध न वारिती ॥ अंगी सामर्थ्य असोनियां ॥४९॥ ब्राह्मण बैसवोनि बाहेरी ॥ उत्तमान्न जेविती गृहांतरी ॥ सोयर्यांची प्रार्थना करी ॥ संग्रहणी पोटशूळ होती तयां ॥१५०॥ एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती ॥ एक ब्राह्मणांची सदनें जाळिती ॥ एक दीनासी मार्गी नागविती ॥ एक संतांचा करिती अपमान ॥५१॥ एक करिती गुरुछळाण ॥ एक म्हणती पाहों याचें लक्षण ॥ नाना दोष आरोपिती अज्ञान ॥ त्यांचे संतान न वाढे ॥५२॥ जो सदा पितृदोष करी ॥ जो ब्रह्मवृंदासी अव्हेरी ॥ शिवकीर्तन ऐकतां त्रासे अंतरी ॥ तरी पितृवीर्य नव्हे तो ॥५३॥ शिवकीर्तनीं नव्हे सादर ॥ तरी कर्णमूळरोग निर्धार ॥ नसत्याचि गोष्टी जल्पे अपार ॥ जो दर्दुर होय निर्धारें ॥५४॥ शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण ॥ तेथें शयन करीतां सर्प होय दारुण ॥ एक अविवादक छळक जाण ॥ ते पिशाचयोनी पावती॥५५॥ एकां देवार्चनीं वीट येत ॥ ब्राह्मण पूजावया कंटाळत ॥ तीर्थप्रसाद अव्हेरीत ॥ त्यांच्या आंखुडतीअंगशिरा॥५६॥मृगम्हणे ऐसीं पापें अपार ॥ मम मस्तकीं होईल परम भार ॥ मग पारधई म्हणे सत्वर ॥ जाईस्वस्थानामृगवर्या॥५७॥व्याधशिवनामें गजें ते क्षणीं ॥ कंठ सद्गदित अश्रु नयनीं ॥ मागुती बिल्वदळें खुडोनी ॥ शिवावरी टाकीतसे ॥५८॥ चौं प्रहरांच्या पूजा चारी ॥ संपूर्ण झाल्या शिवजागरीं ॥ सप्तजन्मींचीं पापें निर्धारीं ॥ मुळींहूनी भस्म झालीं ॥५९॥ तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळित ॥ सुपर्णाग्रज उदय पावत ॥ आरक्तवर्ण शोभा दिसत ॥ तेंचि कुंकुम प्राचीचें ॥१६०॥ तों तिसरी मृगी आली अकस्मात ॥ व्याध देखिला कृतांतवत ॥ म्हणे मारूं नको मज यथार्थ ॥ बाळासी स्तन देऊनि येतें मी ॥६१॥ व्याध अत्यंत हर्षभरित ॥ म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ ॥ तो ऐकावया म्हणत ॥ शपथ करूनि जाय तूं ॥६२॥ यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक ॥ जो तृणदाहक ग्रामदाहक ॥ गोब्राह्मणांचें कोंडी उदक ॥ क्षयरोग त्यासी न सोडी ॥६३॥ ब्राह्मणांची सदनें हरिती देख ॥ त्यांचे पूर्वज रौरवीं पडती नि:शंक ॥ मातृपुत्रां बिघडती एक ॥ स्त्रीपुरुषां विघड पाडिती ॥६४॥ देवब्राह्मण देखोन ॥ खालती न करिती कदा मान ॥ निंदीती बोलती कठोर वचन ॥ यम कर चरण छेदी तयांचे ॥६५॥ परवस्तु चोरावया देख ॥ अखंड लाविला असें रोंख ॥ साधुसन्मानें मानी दुःख ॥ त्यासी नेत्ररोगतिडका न सोडिती ॥६६॥ पुस्तकचोर ते मुके होती ॥ रत्नचोरांचे नेत्र जाती ॥ अत्यंत गर्वी ते महिष होती ॥ पारधी निश्चिती श्येनपक्षी ॥६७॥ भक्तांची जो निंदा करीत ॥ त्याचे मुखीं दुर्गंधी घाणित ॥ जो मातापितयांसी ताडित ॥ लुला होत यालागीं ॥६८॥ जो अत्यंत कृपण ॥ धन न वेंची अणुप्रमाण ॥ तो महाभुजंग होऊन ॥ धुसधुसीत बैसे तेथें ॥६९॥ भिक्षेसी यतीश्वर आला ॥ तो जेणें रिता दवडिला ॥ शिव त्यावरी जाण कोपला ॥ संतती संपत्ती दग्ध होय ॥१७०॥ ब्राह्मण बैसला पात्रावरी ॥ उठवूनि घातला बाहेरी ॥ त्याहूनियां दुराचारी ॥ दुसरा कोणी नसेचि ॥७१॥ ऐसा धर्माधर्म ऐकोन ॥ पारधी सद्गद बोले वचन ॥ स्वस्थळा जाई जलपान करूनियां ॥ बाळांसी स्तन देऊन येई !शिवगणीं बहुत प्रार्थून ॥ दिव्य विमानीं बैसविला॥८४॥ मृगें पावलीं दिव्य शरीर ॥ तींही विमानी आरूढलीं समग्र ॥ व्याधाची स्तुति वारंवार ॥ करिती सुरगण सर्वही॥८५॥ व्याध नेला शिवपदाप्रती ॥ तारामंडळी मृगे राहती ॥ अद्यापि गगनीं झळकती ॥ जन पाहती सर्व डोळां ॥८६॥ सत्यवतीहृदयरत्नखाणी ॥ रसभरित बोलिला लिंगपुराणीं ॥ तें सज्जन ऐकोत दिनरजनीं ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥८७॥ धन्य तें शिवरात्रिव्रत ॥ श्रवणें पातक दग्ध होत ॥ जे हें पठण करिती सावचित्त ॥ धन्य पुण्यवंत नर तेचि ॥८८॥ सज्जन श्रोते निर्जर सत्य ॥ प्राशन करोत शिवलीलामृत ॥ निंदक असुर कुतर्कि बहुत ॥ त्यांसी प्राप्त कैचें हें ॥८९॥ कैलासनाथ ब्रह्मानंद ॥ तयांचे पदकल्हार सुगंध ॥ तेथें श्रीधर अभंग षट्पद ॥ रुंजी घालीत शिवनामें ॥१९०॥ श्रीगणेशाय न
मः

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड ॥ द्वितीयाध्याय गोड हा ॥१९१॥ 

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥


Tuesday, 13 May 2014

" श्री शिवलीलामृत कथासार " अध्याय पहिला



" श्री शिवलीलामृत कथासार "

अध्याय पहिला


श्रीगणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्णब्रह्मानंदशाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरो ॥१॥ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिध्दा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषा जगत्पते ॥२॥जय जय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुध्द्चैतन्या ॥ विश्वंभरा कर्ममोचकगहना ॥ मनोजदहना मनमोहन जो ॥३॥भक्तवल्लभ तूं हिमनगजामात ॥ भाललोचन नीलग्रीव उमानाथ ॥ मस्तकीं स्वर्धुनी विराजित ॥ जातिसुमनहारवत जी ॥४॥पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक ॥ यक्षपतिमित्र प्रतापार्क ॥ दक्षमखविध्वंसक मृगांक ॥ निष्कलंक तव मस्तकीं ॥५॥विशाळ भाळ कर्पूरगौर ॥ काकोलभक्षक निजभक्तरक्षणा ॥ विश्वासाक्षी भस्मलेपन ॥ भयमोचन भवहारक जो ॥६॥जो सर्गस्थित्यंतकारण ॥ त्रिशूलपाणी शार्दुलचर्मवसन ॥ स्कंदतात सुहास्यवदन ॥ मायाविपिनदहन जो ॥७॥जो सच्चिदानंद निर्मळ॥ शिव शांत ज्ञानघन अचळ ॥ जो भानुकोटितेज अढळ ॥ सर्वकाळ व्यापक जो ॥८॥सकलकलिमलदहन कल्मषमोचन ॥ अनंतब्रह्मांडनायक जगरक्षण ॥ पद्मजतातमनरंजन ॥ जननमरणनाशक जो ॥९॥कमलोद्भव कमलावर ॥ दशशतमुख दशशतकर ॥ दशशतनेत्र सुर भूसुर ॥ अहोरात्र ध्याती जया ॥१०॥भव भवांतक भवानीवर ॥ स्मशानवासी गिरां अगोचर ॥ जो स्वर्धुनीतीरविहार ॥ विश्वेश्वर काशीराज जो ॥११॥व्योमहरण व्यालभूषण ॥ जो गजदमन अंधकमर्दन ॥ ॐकारमहाबलेश्वर आनंदघन ॥ मदगर्वभंजन अज अजित जो ॥१२॥अमितगर्भ निगमागमनुत ॥ जो दिगंबर अवयवरहित ॥ उज्जयिनी महाकाळ कालातीत ॥ स्मरणे कृतांतभय नाशी ॥१३॥दुरितकाननवैश्वानर ॥ जो निजजनचित्तचकोर चंद्र ॥ वेणुपवरमहत्पापहर ॥ घुष्णेश्वर सनातन जो ॥१४॥जो उमाहृदयपंजकीर ॥ जो निजजनहृदयाब्जभ्रमर ॥ तो सोमनाथ शशिशेखर ॥ सौराष्ट्रदेशविहारी जो ॥१५॥कैरवलोचन करुणासमुद्र ॥ रुद्राक्षभूषण रुद्रावतार ॥ भीम भयानक भीमाशंकर ॥ तपा पार नाहीं ज्याच्या ॥१६॥नागदमन नागभूषण ॥ नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान ॥ ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण ॥ नागाननजनक जो ॥१७॥वृत्ररिशत्रुजनकवरदायक ॥ बाणवल्लभ पंचबाणांतक ॥ भवरोगवैद्य त्रिपुरहारक ॥ वैजनाथ अत्यद्भुत जो ॥१८॥त्रिनयन त्रिगुणातीत ॥ त्रितापशमन त्रिविधभेदरहित ॥ त्र्यंबकराज त्रिदोषानलशांत ॥ करूणाकर बलाहक जो ॥१९॥कामसिंधुरविदारककंठीरव ॥ जगदानंदकंद कृपार्णव ॥ हिमनगवासी हैमवतीधव ॥ हिमकेदार अभिनव जो ॥२०॥पंचमुकुट मायामलहरण ॥ निशिदिन गाती आम्नाय गुण ॥ नाहीं जया आदि मध्य अवसान ॥ मल्लिकार्जुन श्रीशैलवास ॥२१॥जो शक्रारिजनकांतकप्रियकर ॥ भूजासंतापहरण जोडोनि कर ॥ जेथे तिष्ठत अहोरात्र ॥ रामेश्वर जगद्गुरु ॥२२॥ऐसिया शिवा सर्वोत्तमा ॥ अज अजित ब्रह्मानंदधामा ॥ तुझा वर्णावया महिमा ॥ निगमागमां अतर्क्य ॥२३॥ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ तव गुणार्णव अगाध थोर ॥ तेथें बुध्दि चित्त तर्क पोहणार ॥ न पावती पार तत्वतां ॥२४॥कनकाद्रिसहित मेदिनीचें वजन ॥ करावया ताजवा आणूं कोठून ॥ व्योम सांठवे संपूर्ण ॥ ऐसें सांठवण कोठून आणूं ॥२५॥मेदिनीवसनाचें जळ आणि सिकता ॥ कोणत्या मार्पे मोजूं आतां ॥ प्रकाशावया आदित्या ॥ दीप सरता केवीं होय ॥२६॥धरित्रीचें करूनि पत्र ॥ कुधर कज्जल जलधि मषीपात्र ॥ सुरद्रुम लेखणी विचित्र ॥ करूनि लिहीत कंजकन्या ॥२७॥तेही तेथें राहिली तटस्थ ॥ तरी आतां केवीं करूं ग्रंथ ॥ जरी तूं मनीं धरिसी यथार्थ ॥ तरी काय एक न होय ॥२८॥द्वितीयेचा किशोर इंदु ॥ त्यासी जीर्णदशी वाहती दीनबंधु ॥ तैसे तुझे गुण करुणासिंधु ॥ वर्णीतसें अल्पमती ॥२९॥सत्यवतीहृदयरत्नमराळ ॥ भेदीत गेला तव गुणनिराळ ॥ अंत नकळेचि समूळ ॥ तोही तटस्थ राहिला ॥३०॥तेथें मी मंदमति किंकर ॥ केवीं क्रमूं शकें महीमांबर ॥ पर आत्मसार्थक करावया साचार ॥ तव गुणार्णवीं मीन झालों ॥३१॥ऐसे शब्द ऐकतां साचार ॥ तोषला दाक्षायणीवर ॥ म्हणे शिवलिलामृत ग्रंथ परिकर ॥ आरंभी रस भरीन मी ॥३२॥जैसा घरूनि शिशूचा हात ॥ अक्षरें लिहवी पंडित ॥ तैसे तव मुखें मम गुण समस्त ॥ सुरस अत्यंत बोलवीन मी ॥ ३३॥श्रोतीं व्हावें सावधचित्त ॥ स्कंद्पुराणीं बोलिला श्रीशुकतात ॥ अगाध शिवलीलामृत ग्रंथ ॥ ब्रह्मोत्तरखंड जें ॥३४॥नैमिषारण्यीं शौनकादिक सुमती ॥ सूताप्रति प्रश्न करिती ॥ तूं चिदाकाशींचा रोहिणीपति ॥ करीं तृप्ति श्रवणचकोरां ॥३५॥तुवां बहुत पुराणें सुरस ॥ श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष ॥ अगाध महिमा आसपास ॥ दशावतार वर्णिले ॥३६॥भारत रामायण भागवत ॥ ऐकतां श्रवण झाले तृप्त ॥ परी शिवलीलामृत अद्भुत ॥ श्रवणद्वारें प्राशन करूं ॥३७॥यावरी वेदव्यासशिष्य सूत ॥ म्हणे ऐका आतां देऊनि चित्त ॥ शिवचरित्र परमाद्भुत ॥ श्रवणें पातकपर्वत जळती ॥३८॥आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ॥ संतति संपत्ति ज्ञानविचार ॥ श्रवणमात्रें देणार ॥ श्रीशंकर निजांगे ॥३९॥सकळ तीर्थव्रतांचे फळ ॥ महामखांचे श्रेय केवळ ॥ देणार शिवचरित्र निर्मळ ॥ श्रवणें कलिमल नासती ॥४०॥सकल यज्ञामाजी जपयज्ञ थोर ॥ म्हणाल जपावा कोणता मंत्र ॥ तरी मंत्रराज शिवषडक्षर ॥ बीजसहित जपावा ॥४१॥दुजा मंत्र शिवपंचाक्षर ॥ दोहींचे फळ एकचि साचार ॥ उतरती संसारार्णवपार ॥ ब्रह्मादिसुरऋषी हाचि जपती ॥४२॥दारिद्र दु:ख भय शोक ॥ काम क्रोध द्वंद्व पातक ॥ इतुक्यांसही संहारक ॥ शिवतारक मंत्र जो ॥४३॥तुष्टीपुष्टीधृतिकारण ॥ मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण ॥ कर्ता मंत्रराज संपुर्ण ॥ अगाध महिमा न वर्णवे ॥४४॥नवग्रहांत वासरमणि थोर ॥ तैसा मंत्रात शिवपंचाक्षर ॥ कमलोद्भव कमलावर ॥ अहोरात्र हाचि जपती ॥४५॥शास्त्रांमाजी वेदांत ॥ तीर्थामाजी प्रयाग अद्भुत ॥ महास्मशान क्षेत्रांत ॥ मंत्रराज तैसा हा ॥४६॥शास्त्रांमाजी पाशुपत ॥ देवांमाजी कैलासनाथ ॥ कनकादे जैसा पर्वतांत ॥ मंत्र पंचाक्षरी तेवीं हा ॥४७॥केवळ परमतत्व चिन्मात्र ॥ परब्रह्म हेंचि तारक मंत्र ॥ तीर्थव्रतांचे संभार ॥ ओवाळूनि टाकावे ॥४८॥ हा मंत्र आत्म प्राप्ताची खाणी ॥ कैवल्यमार्गीचा प्रकाशतरणी ॥ अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी ॥ सनकादिक ज्ञानि हाचि जपती ॥४९॥स्त्री शूद्र आदिकरूनी ॥ हाचि जप मुख्य चहूं वर्णी ॥ गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरूनी ॥ दिवसरजनीं जपावा ॥५०॥जाग्रुतीं स्वप्नी येतां जातां ॥ उभें असतां निद्रा करितां ॥ कार्या जातां बोलतां भांडता ॥ सर्वदाही जपावा ॥५१॥शिवमंत्रध्वनिपंचानन ॥ कर्णी आकर्णितां दोषावारण ॥ उभेचि सांडती प्राण ॥ न लागतां क्षण भस्म होती ॥५२॥ न्यास मातृकाविधि आसन ॥ न लागे जपावा प्रीतीकरून ॥ शिव शिव उच्चारितां पूर्ण ॥ शंकर येऊनि पुढें उभा ॥५३॥अखंड जपती जे हा मंत्र ॥ त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र ॥ आपुल्या अंगाची साउली करी पंचचक्र ॥ अहोरात्र रक्षी तयां ॥५४॥मंत्र जपकांलागुनी ॥ शिव म्हणे मी तुमचा ऋणी ॥ परी तो मंत्र गुरुमुखेंकरूनी ॥ घेइंजे आधीं विधीने ॥५५॥ गुरु करावा मुख्यवर्ण ॥ भक्तिवैराग्यदिव्यज्ञान ॥ सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण ॥ या चिन्हेकरून मंडित जो ॥५६॥मितभाषणी शांत दांत ॥ अंगी अमानित्व अदंभित्व ॥ अहिंसक अतिविरिक्त ॥ तोचि गुरु करावा ॥५७॥वर्णानां ब्राह्मणो गुरु: ॥ हीं वेदवचनें निर्धारु ॥ हा त्यापासोनि मंत्रोच्चारु ॥ करूनि घ्यावा प्रीतीनें ॥५८॥जरी आपणासी ठाउका मंत्र ॥ तरी गुरुमुखें घ्यावा निर्धार ॥ उगाचि जपे तो अविचार ॥ तरी निष्फळ जाणिजे ॥५९॥कामक्रोधमदयुक्त ॥ जे कां प्राणी गुरुविरहित ॥ त्यानी ज्ञान कथिलें बहुत ॥ परी त्यांचे मुख न पहावें ॥६०॥वेदशास्त्रं शोधून ॥ जरी झालें अपरोक्षज्ञान ॥ करी संतांशीं चर्चा पूर्ण ॥ तरी गुरुविण तरेना ॥६१॥एक म्हणती स्वप्नी आम्हांते ॥ मंत्र सांगितला भगवंतें ॥ आदरें सांगे लोकांते ॥ परी तो गुरूविण तरेना ॥६२॥प्रत्यक्ष येऊनियां देव सांगितला जरी गुह्यभाव ॥ तरी तो न तरेचि स्वयमेव ॥ गुरूसी शरण न रिघतां ॥६३॥मौजीबंधनाविण गायत्रीमंत्र ॥ जपे तो भ्रष्ट अपवित्र ॥ वराविण वर्हाडी समग्र ॥ काय व्यर्थ मिळोनी ॥६४॥तो वाचक झाला बहुवस ॥ परी त्याचे न चुकती गर्भवास ॥ म्हणोनि सांप्रदाययुक्त गुरूस ॥ शरण जावें निर्धारे ॥६५॥जरी गुरु केला भलता एक ॥ परी पूर्वसंप्रदाय नसे ठाऊक ॥ जैसे गर्भांधासी सम्यम ॥ वर्णव्यक्त स्वरूप न कळेचि ॥६६॥असो त्या मंत्राचे पुरश्चरण ॥ उत्तम क्षेत्री करावें पूर्ण ॥ काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य ॥ गोकर्णक्षेत्र आदिकरुनि ॥६७॥शिवविष्णुक्षेत्र सुगम ॥ पवित्र स्थळीं जपावा सप्रेम ॥ तरी येचिविषयीं पुरातन उत्तम ॥ कथा सांगेन ते ऐका ॥६८॥श्रवणी पठणीं निजध्यास ॥ आदरें धरावा दिवसेंदिवस ॥ आनुमोदन देता कथेस ॥ सर्व पापास क्षय होय ॥६९॥श्रवण मनन निजध्यास ॥ धरितां साक्षात्कार होय सरस ॥ ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस ॥ पावन सर्व होती ॥७०॥तरी मथुरानाम नगर ॥ यादवंशी परमपवित्र ॥ दाशार्हनामें राजेंद्र ॥ अति उदार सुलक्षणी ॥७१॥सर्व राजे देती करभार ॥ कर जोडोनि नमिती वारंवार ॥ त्यांच्या मुगुटरत्नाकिरणें साचार ॥ प्रपदें ज्याचीं उजळलीं ॥७२॥मुगुटघर्षणेंकरूनी ॥ किरणें पडलीं दिसती चरणीं ॥ जेणें सत्तावसन पसरूनी ॥ पालाणिली कुंभिनी हे ॥७३॥उभारिला यशोध्वज ॥ जेवीं शरत्काळींचा द्विजराज ॥ सकल प्रजा आणि द्विज ॥ चिंतिती कल्याण जयाचें ॥७४॥जैसा शुध्दद्वितीयेचा हिमांश ॥ तेवीं ऐश्वर्य चढे विशेष ॥ जो दुर्बुध्दि दासीस ॥ स्पर्श न करी कालत्रयीं ॥७५॥सब्दुध्दिधर्मपत्नीसीं रत ॥ स्वरूपाशीं तुळिजे रमानाथ ॥ दानशस्त्रें समस्त ॥ याचकांचे दारिद्र्य निवटिलें ॥७६॥भृभुजांवरी जामदग्न्य ॥ समरांगणी जेवीं प्रळयाग्न ॥ ठाण न चळे रणींहून ॥ कुठारघायें भूरुह जैसा ॥७७॥चतुर्दश विद्या चौसष्टी कळा ॥ आकळी जेवीं करतळींचा आंवळा ॥ जेणें दानमेघें निवटिला ॥ दारिद्यधुरोळा याचकांचा ॥७८॥बोलणें अति मधुर ॥ मेघ गजें जेवीं गंभीर ॥ प्रजाजनांचे चित्तमयूर ॥ नृत्य करिती स्वानंदे ॥७९॥ज्याचा सेमासिंधु देखोनि अद्भुत ॥ जलसिंधु होय भयभीत ॥ निश्चळ अंबारींचा ध्रुव सत्य ॥ वचन तेवीं न चळेचि ॥८०॥त्याची कांता रूपवती सती ॥ काशीराजकुमारी नाम कलावती ॥ जिचें स्वरूप वर्णी सरस्वती ॥ विश्ववदनेंकरूनियां ॥८१॥जे लावण्यसागरींची लहरी ॥ खंजनाक्षी बिंबाधरी ॥ मृदुभाषिणी पिकस्वरी ॥ हंसगमना हरिमध्या ॥८२॥शशिवदना भुजंगवेणी ॥ अलंकारां शोभा जिची तनु आणी ॥ दशन झळकती जेवीं हिरेखाणी ॥ बोलतां सदनी प्रकाश पडें ॥८३॥सकलकलानिपुण ॥ यालागी कलावती नाम पूर्ण ॥ जें सौदर्यवैरागरींचे रत्न ॥ जे निधान चातुर्यभूमीचें ॥८४॥आंगीचा सुवास न माये सदनांत ॥ जिचें मुखाब्ज देखतां नृपनाथ ॥ नेत्रमिलिंद रुंजी घालीत ॥ धणी पाहतां न पुरेचि ॥८५॥नूतन आणिली पर्णून ॥ मनसिजें आकर्षिले रायाचें मन ॥ बोलावूं पाठविलें प्रीतीकरून ॥ परी ते न येचि प्रार्थितां ॥८६॥स्वरूपश्रुंगारजाळें पसरून ॥ आकर्षिला नुपमानसमीन ॥ यालागीं दशार्हराजा उठोन ॥ आपणचि गेला तिजपाशीं ॥८७॥म्हणे श्रुंगारवल्ली शुभांगी ॥ मम तनुवृक्षासी आलिंगीं ॥ उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगीं ॥ अत्यानंदे सर्वांदेखतां ॥८८॥तंव ते श्रुंगारसरोवरमराळीं ॥बोले सुहास्यवदना वेल्हाळी ॥ म्हणे म्यां उपासिला शशिमौळी ॥ सर्वकाळ व्रतस्थ असें ॥८९॥जे स्री रोगिष्ट अत्यंत ॥ गर्भिणी किंवा ऋतुस्नात ॥ अभुक्त अथवा व्रतस्थ ॥ वृध्द अशक्त न भोगावी ॥९०॥स्त्रीपुरूषें हर्षयुक्तं ॥ असावीं तरुण रूपवंत ॥ अष्टभोगेंकरूनि युक्त ॥ चिंताग्रस्त नसावीं ॥९१॥पर्वकाळ व्रतदिन निरसून ॥ उत्तमकाळी षड्रस अन्न भक्षून ॥ मग ललना भोगावी प्रीतीकरून ॥ राजलक्षण सत्य हे ॥९२॥राव काममदें मत्त प्रचंड ॥ रतिभरें पसरोनि दोर्दंड ॥ अलिंगन देतां बळें प्रचंड ॥ शरीर त्याचे पोळले ॥९३॥लोहार्गला तप्त अत्यंत ॥ तैसी कलावतीची तनू पोळत ॥ नृप वेगळा होऊनि पुसत ॥ कैसा वृत्तांत सांग हा ॥९४॥श्रृंगरसदनाविलासिनी ॥ मम हृदयानंदवर्धिनी ॥ सकळ संशय टाकुनी ॥ मुळींहूनी गोष्टी सांग ॥९५॥म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस ॥ क्रोधें भरों नेदीं मानस ॥ माझा गुरु स्वामी दुर्वास ॥ अनसुयात्मज महाराज ॥९६॥त्या गुरुने परम पवित्र ॥ मज दीधला शिवपंचाक्षरी मंत्र ॥ तो जपतां अहोरात्र ॥ परमपावन पुनीत मी ॥९७॥ममांग शीतळ अत्यंत ॥ तव कलेवर पापसंयुक्त ॥ अगम्यागमन केलें विचाररहित ॥ अभक्ष्य तितुकें भक्षिलें ॥९८॥मज श्रीगुरुदयेंकरून ॥ राजेंद्रा आहें त्रिकाळज्ञान ॥ तुज जप तप शिवार्चन ॥ घडलें नाहीं सर्वथा ॥९९॥घडलें नाहीं गुरुसेवन ॥ पुढें राज्यांतीं नरक दारूण ॥ ऐकतां राव अनुतापेंकरून ॥ सद्गदित जाहला ॥१००॥म्हणे कलावती गुणगंभीरे ॥ तो शिवमंत्र मज देई आदरें ॥ ज्याचेनि जपें सर्वत्रं ॥ महत्पापें भस्म होती ॥१॥ती म्हणे हे भृभुजेंद्र ॥ मज सांगावया नाहीं अधिकार ॥ मी वल्लभा तूं प्राणेश्वर ॥ गुरु निर्धार तूं माझा ॥२॥तरी यादवकुळीं गुरु वसिष्ठ ॥ गर्गमुनि महाजाज श्रेष्ठ ॥ जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट ॥ विद्या वरिष्ठ तयाची ॥३॥जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी ॥ तैसाच महाराज गर्गमुनी ॥ त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी ॥ शिवदीक्षा घेइंजे ॥४॥मग कलावतीसहित भूपाळ ॥ गर्गाश्रमीं पातला तत्काळ ॥ साष्टांग नमूनि करकमळ ॥ जोडूनि उभा ठाकला ॥५॥अष्टभावें दाटूनि हृदयीं ॥ म्हणे शिवदीक्षा मज देई ॥ म्हणूनि पुढती लागे पायीं ॥ मिती नाही भावार्था ॥६॥यावरी तो गर्गमुनी ॥ कृतांतभगिनीतीरा येऊनी ॥ पुण्यवृक्षातळी बैसोनी ॥ स्नान करवी यमुनेचें ॥७॥उभयतांनी करूनि स्नान ॥ यथासांग केलें शिवपूजन ॥ यावरी दिव्य रत्नें आणून ॥ अभिषेक केला गुरूसी ॥८॥दिव्याभरणें दिव्य वस्त्रें ॥ गुरु पुजिला नृपे आदरें ॥ गुरुदक्षिणेसी भांडारे ॥ दाशार्हरायें समर्पिली ॥९॥तनुमनधनेंसी उदार ॥ गर्गचरणीं लागे नृपवर ॥ असोनि गुरूसी वंचिती जे पामर ॥ ते दारुण निरय भोगिती ॥११०॥श्रीगुरुचे घरीं आपदा ॥ आपण भोगी सर्व संपदा ॥ कैचें ज्ञान त्या मतिमंदा ॥ गुरुब्रह्मानंदा न भजे जो ॥११॥एक म्हणती तनुमनधन ॥ नाशिवंत गुरुसी काय अर्पून ॥ परम चांडाळ त्याचें शठज्ञान ॥ कदा वदन न पाहावें ॥१२॥धिक् विद्या धिक् ज्ञान ॥ धिक् वैराग्यसाधन ॥ चतुर्वेद शास्त्रें आला पढून ॥ धिक् पठण तयाचें ॥१३॥जैसा खरपृष्ठईवरी चंदन ॥ षड्रसीं दर्वी व्यर्थ फिरून ॥ जेवीं मापें तंदुल मोजून ॥ इकडून तिकडे तिकडे टाकिती ॥१४॥घाणा इक्षुरस गाळी ॥ इतर सेविती रसनव्हाळी ॥ कीं पात्रांत शर्करा सांठविली ॥ परी गोडी न कळे तया ॥१५॥असो ते अभाविक खळ ॥ तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ ॥ षोडशोपचारें निर्मळ ॥ पूजन केलें गुरूचें ॥१६॥उभा ठाकला कर जोडून ॥ मग तो गर्गे हृदयी धरून ॥ मस्तकीं हस्त ठेवून ॥ शिवषडक्षर मंत्र सांगे ॥१७॥हृदयाआकाशभुवनीं ॥ उगवला निजबोधतरणी ॥ अज्ञानतम तेच क्षणी ॥ निरसूनि नवल जाहलें ॥१८॥अद्भुत मंत्राचें महिमान ॥ रायाचिया शरीरामधून ॥ कोट्यवधि काक निघोन ॥ पळते झाले तेधवां ॥१९॥किती एकांचे पक्ष जळाले ॥ चरफडितचि बाहेर आले ॥ अवघेचि भस्म होऊनि गेले ॥ संख्या नाहीं तयांते ॥१२०॥जैसा किंचित् पडतां कृशान ॥ दग्ध होय कंटकवन ॥ तैसे काक गेले जळोन ॥ देखोनि राव नवल करी ॥२१॥गुरूसी नमूनि पुसे नृप ॥ काक कैंचे निघाले अमूप ॥ माझें झालें दिव्य रूप ॥ निर्जराहूनि आगळं ॥२२॥गुरु म्हणे ऐक साक्षेपें ॥ अनंत जन्मींची महापापे ॥ बाहेर निघालीं काकारूपें ॥ शिवमंत्रप्रतापे भस्म झाली ॥२३॥निष्पाप झाला नृपवर ॥ गुरुस्तवन करी वारंवार ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र ॥ तूं धन्य गुरु पंचाक्षरी ॥२४॥पंचभुतांची झाडणी करून ॥ सावध केलें मजलागून ॥ चारी देह निरसून ॥ केले पावन गुरुराया ॥२५॥पंचवीस तत्वांचा मेळ ॥ त्यांत सांपडलों बहुत काळ ॥ क्रोध महिषासुर सबळ ॥ कामवेताळ धुसधुसी ॥२६॥आशा मनशा तृष्णा कल्पना ॥ भ्रांति भुली इच्छा वासना ॥ या जखिणी यक्षिणी नाना ॥ विटंबीत मज होत्या ॥२७॥ऐसा हा अवघा मायामेळ ॥ तुवां निरसला तात्काळ ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ ॥ गुरु दयाळ धन्य तूं ॥२८॥सहस्त्रजन्मपर्यंत ॥ मज ज्ञान झालें समस्त ॥ पापें जळाली असंख्यात ॥ काकरूपे देखिलीं म्यां ॥२९॥सुवर्णस्तेय अभक्ष्यभक्षक ॥ सुरापान गुरूतल्पक ॥ परदारागमन गुरुनिंदक ॥ ऐसीं नाना महत्पापें ॥१३०॥गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक ॥ स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक ॥ परनिंदा पशुहिंसक ॥ वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन ॥३१॥मित्रद्रोही गुरुद्रोही ॥ विश्वदोही वेदद्रोही ॥ प्रासादभेद लिंगभेद पाहीं ॥ पंक्तिभेद हरिहरभेद ॥३२॥ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक ॥ पाखांडमति मिथ्यावादक ॥ भेदबुध्दि भ्रष्टमार्गस्थापक ॥ स्त्रीलंपटदुराचारी ॥३३॥कृतघ्न परद्रव्यापहारक ॥ कर्मभ्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक ॥ बकध्यानी गुरुछळक ॥ मातृहतक पितृहत्या ॥३४॥दुर्बलघातुक कर्ममार्गघ्न ॥ दीनहत्यारी पाहती पैशून्य ॥ तृणदाहक पीडिती सज्जन ॥ गोत्रवध भगिनीवध ॥३५॥कन्या विक्रय गोविक्रय ॥ हयविक्रय रसविक्रय ॥ ग्रामदाहक आत्महत्या पाहें ॥ भ्रूणहत्य महापापें ॥३६॥हीं महापापें सांगितलीं क्षुद्रपापें नाहीं गणिलीं ॥ इतुकीं काकरूपें निघालीं ॥ भस्म झालीं प्रत्यक्ष ॥३७॥कांही गांठी पुण्य होतें परम ॥ म्हणोनि नरदेह पावलों उत्तम ॥ गुरुप्रतापें तरलों नि:सीम ॥ काय महिमा बोलू आतां ॥३८॥गुरुस्तवन करूनि अपार ॥ ग्रामासी आला दाशार्ह नृपवर ॥ सवें कलावती परमचतुर ॥ केला उध्दार रायाचा ॥३९॥जपतां शिवमंत्र निर्मळ ॥ राज्य वर्धमान झालें सकळ ॥ अवर्षणदोष दुष्काळ ॥ देशांतूनि पळाले ॥१४०॥ वैधव्य आणि रोग मृत्य ॥ नाहींच कोठें देशांत ॥ अलिंगितां कलावतीसी नृपनाथ ॥ शशीऐसी शीतल वाटे ॥४१॥शिव भजनीं लाविले सकळ जन ॥ घरोघरीं होत शिवकीर्तन ॥ रुद्राभिषेक शिवपूजन ॥ ब्राह्मणभोजन यथाविधि ॥४२॥दाशार्हरायाचें आख्यान ॥ जे लिहिती ऐकती करिती पठण ॥ प्रीतीकरूनि ग्रंथरक्षण ॥ अनुमोदन देती जे ॥४३॥सुफळ त्यांचा संसार ॥ त्यांसी निजांगे रक्षी श्रीशंकर ॥ धन्य धन्य तेचि नर ॥ शिवमहिमा वर्णिती जे ॥४४॥पुढें कथा सुरस सार ॥ अमृअताहूनि रसिक फार ॥ ऐकोत पंडित चतुर ॥ गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ॥४५॥पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी ॥ श्रीधरमुख निमित्त करूनी ॥ तोचि बोलवीत विचारोनी ॥ पहावें मनीं निर्धारें ॥४६॥श्रीधरवरद पांडुरंग ॥ तेणें शिरी धरिलें शिवलिंग ॥ पूर्णब्रह्मानंद अभंग ॥ नव्हे विरंग कालत्रयी ॥४७॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ प्रथमोध्याय गोड हा ॥१४८॥

इतिश्री प्रथमोध्याय: समाप्त: ॥॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥



कॉम्पुटर टायपिंग : अमर बनकर पाटील,सावळज 

संपर्क क्र. 09503043724

https://www.facebook.com/amar724 






 





ॐ (जवळ जवळ प्रत्येक शुद्धमंत्राच्या सुरुवातीला लावला जातो) नमः शिवाय - ही पाच अक्षरे असलेला हा मंत्र नंदी ऋषींनी सिद्ध केला व महादेवास प्रार्थना केली की, त्याच्या कृपेचे वहन श्रद्धावानांपर्यंत नंदी ऋषींच्या माध्यमातून होऊ दे. आपण जे शिवाचे वाहन नंदी पाहतो ते नंदी ऋषी आहेत. महाशिवरात्रीचा मध्य घेवून आधीचा एक सप्ताह आणि नंतरचा सप्ताह मिळून नंदी पंधरवडा असतो, ज्या दिवसांमधे नंदी ऋषींनी ॐ नमः शिवाय हा मंत्र सिद्ध केला.
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मान्गरागाय महेश्वराय | नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै 'न'काराय नमःशिवाय || १ || मन्दाकिनीसलिल्चन्दनचर्चिताय नन्दीश्वरममथनाथमहेश्वराय | मन्दारपुष्प्बहुपुष्पसुपूजिताय तस्मै 'म'काराय नमःशिवाय || २ || शिवाय गौरीवदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाद्वरनाशकाय | श्रीनीलकण्ठाय वृषद्वजाय तस्मै 'शि'काराय नमःशिवाय || ३ || वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय | चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै 'व'काराय नमःशिवाय || ४ || यक्षस्वरुपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय | दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै 'य'काराय नमःशिवाय || ५ || पन्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ | शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते || ६ || इति श्रीमच्छन्कराचार्यविरचितं शिवपन्चाक्षरस्तोत्रं सम्पुर्णम
ॐ (जवळ जवळ प्रत्येक शुद्धमंत्राच्या सुरुवातीला लावला जातो) नमः शिवाय - ही पाच अक्षरे असलेला हा मंत्र नंदी ऋषींनी सिद्ध केला व महादेवास प्रार्थना केली की, त्याच्या कृपेचे वहन श्रद्धावानांपर्यंत नंदी ऋषींच्या माध्यमातून होऊ दे. आपण जे शिवाचे वाहन नंदी पाहतो ते नंदी ऋषी आहेत. महाशिवरात्रीचा मध्य घेवून आधीचा एक सप्ताह आणि नंतरचा सप्ताह मिळून नंदी पंधरवडा असतो, ज्या दिवसांमधे नंदी ऋषींनी ॐ नमः शिवाय हा मंत्र सिद्ध केला. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मान्गरागाय महेश्वराय | नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै 'न'काराय नमःशिवाय || १ || मन्दाकिनीसलिल्चन्दनचर्चिताय नन्दीश्वरममथनाथमहेश्वराय | मन्दारपुष्प्बहुपुष्पसुपूजिताय तस्मै 'म'काराय नमःशिवाय || २ || शिवाय गौरीवदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाद्वरनाशकाय | श्रीनीलकण्ठाय वृषद्वजाय तस्मै 'शि'काराय नमःशिवाय || ३ || वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय | चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै 'व'काराय नमःशिवाय || ४ || यक्षस्वरुपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय | दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै 'य'काराय नमःशिवाय || ५ || पन्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ | शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते || ६ || इति श्रीमच्छन्कराचार्यविरचितं शिवपन्चाक्षरस्तोत्रं सम्पुर्णम"

Mere Bhole Nath meri khus nasibi hai ki mai tera bhakt hu !!
Mere fakar ke liye ye kafi hai !!
Tu hi mera murshad hai !!
Tu hi mera isht dev hai !!
Tu waisa hi hai ! jaisa mai chahta hu !!
Bas muje waisa bna de ! jaisa tu chahta hai !!
..............................................................................................

जरे जरे में हैं झांकी भगवान की, किसी सूझ वाली आँख ने पहचान की ।
निगाह मीरा की निराली, पी के ज़हर प्याली, ऐसा गिरिधर बसाया हर श्वास में ।
आया जब काला नाग, बोली धन्य मेरे भाग्य, प्रभु आये आज नाग के लिबास में ।
आओ आओ बलिहार, काले कृषण मुरार, बड़ी कृपा हैं कृपानिधान की ।
धन्यवादी हूँ मैं आप के एहसान की ॥
जरे जरे में हैं झांकी भगवान की, किसी सूझ वाली आँख ने पहचान की ।
..............................................................................................

Jai shiv shankar jai gangadhar karunakar kartaar hare jai kailasi jai avinashi sukhrasi sukhsaar hare jai shashishekhar jai damarudhar jai jai premadhar hare jai tripurari jai madhaari amit anant apaar hare jai rameshwar jai nageshwar vaidyanath kedaar hare kashi pati shree vishwanath jai mritunjaya avikaar hare Shesh Gang ardhang Parvati

..............................................................................................


जय भोले नाथ !!!!! शिव पूरक हैं। शिवत्व पूर्णता है। इनके व्यावहारिक और आध्यात्मिक दोनों तरह के जीवन में खास महत्व हैं। शिव के प्रचलित स्वरूप को ही देखें तो उनके हर अंग, आभूषण और मुद्रा का महत्व है। जैसे - जैसे आप इसे समझते हैं आप शिवमय होते जाते हैं। शिवत्व आपमें उतरता जाता है और आप सरस हो जाते हैं। केवल शिव ही हैं जिनकी आराधना के साथ अमर होने का वरदान जुड़ा हुआ है।
जय भोले नाथ

..............................................................................................

Bhor Bhai Ab Jaajo..Bhakt Khade Hai Dawar Pe Tere...Ab Nidra Ko Tayago.. Aoud Ke Sar Pe Laal Chunariya ..Aa Gai Uasha Rani Kalrav Karte Hain Sab Panchi..Bole Mithi Vaani Mnad-Mand Sugandh Bikhere PAWAN Hiloura Aaya Jaag Bhi Jao Bhole Baba.. Tumhe Jagane Aaya Bhog Lagane Ki Ye Bela Dekho Beet Na jaye Uth Beitho SURYA Devta Ab Aaye.. Kab Jagoge ..Na Jaane Kab Aarti Vandan Hoga Kab Ham Dhup -Deep Karenge..Kab Dekhenge Teri Shobha Ek Tak Dekh Rahe Hain Sare..Kab Tu PALAK Uthaye Darshan Ke Abhilashi hain Ye ..Payse Nain Hamare Kab Uth Ke Bhaktjano Ko Muh Manga VAR doge Jaisi Bhavana Hogi Jiski ..Tum Puran KAR Doge.. Bhor Bhai Ab Jaajo..Bhakt Khade Hai... Dawar Pe Tere ...AB Nidra Ko Tayago.. OM NAMAH SHIVAY..


..............................................................................................